तरुण भारत

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय

प्रतिनिधी/ बेळगाव

सदाशिवनगर विद्युत पुरवठा उपकेंद्रातील हेस्कॉमची विद्युत वाहिनी बर्स्ट झाली आहे. यामुळे मंगळवारी रात्री तीन वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी हिंडलगा पंपिंग हाऊसचा विद्युतपुरवठा बंद झाल्याने 600 अश्वशक्तीचे विद्युत पंप बंद झाले आहेत. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. ऐन संक्रांती सणातच शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

विद्युप पुरवठा करणारी विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री खराब झाली. दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मात्र, मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठाही बंद झाल्याने पंपिंग स्टेशनमधून जलशुद्धीकरण केंद्राला करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.  बुधवारी दिवसभर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, दिवसभर विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करता आला नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील पंप बंद झाला होता. त्या पाणी वितरणाचे कामदेखील ठप्प झाले आहे. दि. 13 आणि 14 रोजी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.  

Related Stories

कॉसमॉस बँकेच्यावतीने मुख्यमंत्री व पंतप्रधान रिलिफ फंडाला 55 लाख

Patil_p

खानापूरात बुधवारी आणखी 9 रूग्णांची भर

Rohan_P

बाची येथील शाळेसाठी स्वयंपाक खोली, शेड मंजूर करण्याची मागणी

Omkar B

श्री समादेवीच्या वार्षिक जन्मोत्सवाला प्रारंभ

Patil_p

रामनगर-खानापूर रस्त्याचा वनवास संपणार कधी

Patil_p

आजपासून चिकोडी होणार खुली

Patil_p
error: Content is protected !!