तरुण भारत

जिल्हय़ात बुधवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण

सव्वा चार लाखांहून अधिक स्वॅब तपासणी

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व जिल्हय़ात बुधवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 450 इतकी झाली असून आतापर्यंत आरोग्य विभागाने 4 लाख 29 हजार 759 जणांची स्वॅब तपासणी केली आहे.

25 हजार 964 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 144 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 47 हजार 387 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. प्रशासनाला 6 हजार 286 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.

आतापर्यंत 3 लाख 94 हजार 593 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बुधवारी एका बेळगाव शहरातील 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापयर्यंत जिल्हय़ातील 342 जण दगावले आहेत.

विश्वेश्वरय्यानगर, रामतीर्थनगर, खासबाग, राणी चन्नम्मानगर, एसपीएम रोड, शिवाजीनगर, टिळकवाडी, शिवबसवनगर, सह्याद्रीनगर, मुत्यानट्टी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तोराळी येथील सीआरपीएफ विभागातील एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

बेळगाव जिह्यात मंगळवारी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

तिसऱया दिवशीही कोरोना रुग्णांचा दीडशेचा टप्पा पार

Amit Kulkarni

कोगनोळीत अपघातात वृद्ध जागीच ठार

Patil_p

विविध संघटनांची जिल्हाधिकाऱयांना निवेदने

Omkar B

माध्यमिक कन्नड विषय शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

ग्लोब थिएटरजवळ ट्राफिक सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा

Patil_p
error: Content is protected !!