तरुण भारत

बेळगावात बॅण्डवादनाने झाले कोरोना लसींचे स्वागत

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनावरील लसीची प्रतीक्षा संपली आहे. बुधवारी भल्या पहाटे पुण्याहून कोविशिल्डच्या 1 लाख 47 हजार लस बेळगावात दाखल झाल्या. आरती ओवाळून व बॅन्डबाजा लावून लसींचे स्वागत करण्यात आले. बेळगाव येथून सात जिल्हय़ांना लस पाठविण्यात येणार आहे.

पुणे येथील सीरम संस्थेने विकसित केलेल्या कोविशिल्डचे 13 बॉक्स एमएच 04 जेके 1669 क्रमांकाच्या विशेष वाहनांतून बेळगावात दाखल झाले. लस घेऊन पुण्याहून बेळगावला आलेल्या या वाहनाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्हॅक्सिन डेपोला भेट देऊन पाहणी केली.

पुण्याहून आलेल्या लसींचे बॉक्स व्हॅक्सिन डेपोमध्ये साठवून ठेवण्यात आले आहेत. 16 जानेवारी रोजी कोरोना योद्धय़ांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी बेळगाव येथून सर्व जिल्हय़ांना गुरुवारी सायंकाळपर्यंत लस पोहोचविण्यात येणार आहेत. बुधवारी काही बॉक्स बागलकोटला पाठविण्यात आल्याचे आरसीएच डॉ. आर. आय. गडाद यांनी सांगितले.

बेळगाव येथून धारवाड, हावेरी व कारवार जिल्हय़ाला लस पाठविण्यात येत आहेत तर बागलकोट येथील प्रादेशिक केंद्रातून बागलकोट, विजापूर, गदग व कोप्पळ जिल्हय़ांना लस पाठविण्यात येणार आहेत. सुरुवातीला विशेष विमानाने लस पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली होती. मात्र केवळ बेंगळूरला विमानाने पाठविण्यात आल्या तर बेळगावला विशेष वाहनाने लस पाठविण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अथणी, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती, कोन्नूर बरोबरच बेळगाव येथील बिम्स् व वंटमुरी कॉलनीतील पीएचसीमध्ये 16 तारखेला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 35 हजार डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा कार्यकर्त्यांना लस देण्यात येणार आहे. 28 दिवसांनंतर या कर्मचाऱयांना दुसऱयांदा लस दिली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ासाठी 70 हजारांहून अधिक लसींची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

जमखंडीतील मतमोजणी केंद्राची तहसीलदारांकडून पाहणी

Patil_p

बेळगावच्या उद्योगाची पूर्वपदाकडे वाटचाल

Patil_p

अनगोळ उद्यमबाग सायकल ट्रक कामाची पाहणी

Patil_p

कुली कामगारांना सोडले त्यांच्या गावी

Patil_p

एटीएसमधील आणखी दोन जवानांना कोरोना

Patil_p

हेस्कॉम कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p
error: Content is protected !!