तरुण भारत

दिल्ली : 357 नवे कोरोना रुग्ण; 11 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीत मागील 24 तासात 357 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 31 हजार 249 वर पोहचली आहे. यामधील 2,991 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 534 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 17 हजार 540 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,718 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 95 लाख 95 हजार 402 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 37,812 आरटीपीसीआर टेस्ट आणि 32,933 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

बद्रीनाथ धाममध्ये मिनी स्मार्ट सिटीची निर्मिती

Patil_p

14 महिन्याच्या मुलीच्या आईची सुटका

Patil_p

न्यायाधीशांना प्रभावित करण्याचा प्रसारमाध्यमांकडून प्रयत्न

Patil_p

ममता बॅनर्जींकडून ‘नेताजीं’चा दाखला

Patil_p

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

Patil_p

‘धन्वंतरी रथा’मुळे कोरोनाला खीळ

Patil_p
error: Content is protected !!