तरुण भारत

मेंदूला नाही म्हातारपण

वय वाढल्यानंतर शरीर भले कमजोर होवो, परंतु मेंदू कमजोर होत नाही, ही गोष्ट अलीकडील काळात झालेल्या अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाली आहे.

  • या संशोधनांनुसार, मेंदू स्वतःचा विकास सतत करीत असतो आणि 35 ते 65 वर्षे वयादरम्यान हा विकास सर्वांत वेगाने होतो. परंतु हे वय पार केल्यानंतरसुद्धा मेंदूचा विकास सुरूच राहतो. परंतु तो नियमित वापरात असणे आवश्यक आहे.
  • जसजसा आपण मेंदूचा वापर कमी करू लागतो, तसतसा त्याच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ लागतो. परंतु तो कार्यान्वित राहिल्यास तो सक्षम राहतो.
  • वय वाढल्यानंतर जरी मेंदूच्या एखाद्या भागावर दुष्परिणाम होत असला, तरी तो भाग केवळ शॉर्ट टर्म मेमरीचा असतो.
  • 65 वर्षांच्या नंतर मेंदूत अधिक डेटा स्टोअर करता येत नाही. पन्नाशीत ज्या प्रकारे शॉर्ट टर्म मेमरी कार्यरत असते, तसे काम करणे ती नंतर बंद करते.
  • जर तुम्हाला कुणी असे सांगितले की, 65 वर्षांच्या वयात तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊ शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याखेरीज वय वाढल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे आपले भ्रमही वाढत जातात. परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की, आपला मेंदू वाढत्या वयाबरोबर कमकुवत होतो.
  • ङयासंदर्भात न्यूरोलॉजिस्ट जॉर्ज बार्टजोकिस यांचे म्हणणे असे आहे की, निम्मे आयुष्य संपल्यानंतर आपण आपल्या मेंदूत साठवून ठेवलेल्या माहितीचा जास्तीत जास्त वापर करू लागतो.
  • प्रत्येक दिवसागणिक आपल्या मेंदूची क्षमता सेकंदाच्या हिशोबाने वाढत जाते. जर जैवशास्त्रीय प्रणालीच्या आधारावर ही गोष्ट समजून घ्यायची झाल्यास आपल्या मेंदूची क्षमता सर्वांत चांगली याच काळात असते, असे म्हणता येईल.
  • सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आपण आपला मेंदू सतत कार्यरत ठेवला तर 60 वर्षे वयानंतरही आपल्याला हव्या त्या क्षेत्रात जोरदार बौद्धिक प्रगती करता येते.

– प्रा. विजया पंडित

Related Stories

अर्धमत्स्येंद्रासन

tarunbharat

जपा मुलांचे डोळे

Omkar B

विशिष्ट खुणांची बोली सांकेतिक भाषा

GAURESH SATTARKAR

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2663 वर

tarunbharat

जेवल्याबरोबर पाणी पीताय ?

tarunbharat

कोरोना आणि भाजीपाला

Omkar B
error: Content is protected !!