तरुण भारत

लेसर उपचारांचा दिलासा

हल्ली बदललेल्या खानपानाच्या सवयी आणि जीवनशैलीतील घातक बदल यांमुळे मूळव्याधीची समस्या सर्रास दिसू लागली आहे. 

  • मूळव्याधीवर लेसर सर्जरीचा उपाय प्रभावी ठरतो. ही अन्य सर्जरीप्रमाणेच आहे. या मदतीने टिश्यूला कापून कोणत्याही आजारावर उपचार केला जातो.
  • पारंपारिक सर्जरीच्या तुलनेत लेसर सर्जरी सर्वोत्तम मानली जाते.  कारण लेसरमुळे रुग्णांला कमीत कमी त्रास होतो आणि रक्तस्राव फारसा होत नाही.
  • यात संसर्ग,जखमा होण्याचे प्रमाण शून्यच राहते. लेसर सर्जरीनंतर रुग्ण लवकर बरा होतो.
  • लेसर सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णाची पडताळणी करतात आणि त्याआधारे मूळव्याधीचे स्वरुप जाणून घेतले जाते. उपचारादरम्यान रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यानुसार डिजिटल उपकरणाच्या मदतीने चाचणी कली जाते.
  • बाहेरील मूळव्याध हा ऍनसच्या बाहेर असतो. त्यामुळे त्याचे निदान लवकर करणे सोपे जाते. तपासणीनंतर रुग्णाचे ऑपरेशन केले जाते. तत्पूर्वी रुग्णाला लोकल ऍनेस्थेशिया दिला जातो.
  • ऍनसच्या आसपासचा भाग बधीर केला जातो आणि लेसर सर्जरी केले जाते. ही सर्जरी 20 ते 30 मिनिटात होते आणि यात रुग्णाला टाके पडत नाहीत, जखमा होत नाहीत.
  • लेसर सर्जरीनंतर रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि रक्तस्राव देखील होत नाही.
  • ऑपरेशनच्या दिवशीच रुग्णाला घरी सोडले जाते. पुढील दोन दिवसात रुग्ण ठणठणीत होतो आणि तो नियमितपणे कामावर जावू शकतो. 

– डॉ. महेश बरामदे

Related Stories

लूनर डाएट म्हनजे काय ?

tarunbharat

किडनीविकार ओळखण्यासाठी….

Omkar B

घोळणा फुटल्यास

Amit Kulkarni

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

Omkar B

मार्जारासन

Omkar B

गर्भनलिकेतून कोरोनसंसर्ग

Omkar B
error: Content is protected !!