तरुण भारत

टेक्स्टाईल उद्योगाची स्थिती सुधारण्याचे संकेत

रेटिंग एजन्सी आयसीआरएचा अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

आगामी आर्थिक वर्षामध्ये टेक्स्टाईल उद्योगाची कामगिरी कोविड पूर्व स्थितीवर पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. सध्या देशातील निर्यात क्षेत्रात होत असणारी मागणी लक्षात घेता टेक्स्टाइल उद्योगाची स्थिती मजबूत होणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी आयसीआरए यांनी वर्तवला आहे.

आर्थिक वर्ष 2022 साठी या क्षेत्राच्या स्थितीचा अंदाज बांधण्यात आला आहे. तसेच देशातील टेक्स्टाईल क्षेत्राने आर्थिक वर्ष 2021 च्या तिसऱया तिमाहीत तेजी अनुभवली असल्याने याचा लाभ येत्या काळातही होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

आयसीआरएने अर्थव्यवस्था, बाजार, ग्राहकांचा आत्मविश्वास यामध्ये दिवसागणिक सुधारणा होत असल्याने बिगर गरजेच्या वस्तूवरील खर्चामध्ये सलगची वाढ राहिली असून याचा लाभ टेक्स्टाईल उद्योगाला झाल्याचे स्पष्ट केले आहे.

व्यापक सुधारणा

देशातील निर्यातीच्या बाजारात मागणीची स्थिती सलगपणे समान्यपातळीवर आली असून आगामी वर्षात या क्षेत्राची स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता असल्याने व्यापक सुधारणा होण्याची माहिती आयसीआरएचे समूह प्रमुख जयंता रॉय यांनी दिली आहे.

Related Stories

गौतम अदानी यांच्या उत्पन्नात 183 टक्के वाढ

Patil_p

करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर दाखल करण्याच्या मुदतीत वाढ

pradnya p

आभूषणे-सोन्याची मागणी 30 टक्क्मयांनी घटणार

Patil_p

जन औषध केंद्रांवर व्हॉट्अप-ईमेलच्या मदतीने मिळणार औषधे

Patil_p

कोळसा उत्पादन घटले

Patil_p

लक्ष्मी ऑर्गेनिकचा लवकरच आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!