तरुण भारत

‘व्हॉट्सऍप’ ऍप डाऊनलोडमध्ये नोंदवली घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नवीन पॉलिसी सहमत करण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकणे व्हॉट्सऍपला अडचणीचे ठरले आहे. एकंदर व्हॉटस्ऍपचे धोरण स्वीकारण्याऐवजी अनकेजण आता दुसऱया प्लॅटफॉर्मवर नोंदणी करत आहेत. 6 जानेवारी रोजी नवीन पॉलिसीच्या घोषणेनंतर भारतामध्ये 40 लाखपेक्षा अधिक मोबाईलवर सिग्नल (24 लाख) आणि टेलीग्राम(16लाख)ऍप डाऊनलोड करण्यात आले आहेत. टेलीग्रामने बुधवारी घोषणा केली आहे, की जगामध्ये 50 कोटी डाऊनलोडचा आकडा प्राप्त केला आहे.

Advertisements

मागील 72 तासांमध्ये जगात अडीच कोटी नवीन ग्राहकांनी टेलीग्राम ऍप डाऊनलोड केले आहे. टेलीग्रामला भारतामध्ये किती लोकांनी डाऊनलोड केले आहे हे मात्र कळू शकलेले नाही.

डाटा ऍनालिटिक्स एजन्सी सेंसर टॉवर यांच्या माहितीनुसार व्हॉट्सऍपने घोषणा करण्याच्या पहिल्या आठवडय़ात 2.5लाख सिग्नल ऍप डाऊनलोड करण्यात आले आहेत. पॉलिसीच्या घोषणेनंतर पहिल्या आठवडय़ात 88 लाख ग्राहकांनी सिग्नलवर साइन इन केले आहे.

डाऊनलोडमध्ये 35 टक्क्यांची घट

सेंसर टॉवर व ऍपटोपि या सारख्या एजन्सीनुसार व्हॉट्सऍपच्या डाऊनलोडमध्ये या दरम्यान 35 टक्क्यांची घट झाली आहे. यामध्ये महिंद्रा कंपनी समूह आणि टाटा समूहाचे चेअरमनसह अन्य दिग्गजांनी व्हॉट्सऍपला अलविदा केल्याचे समजते.

Related Stories

शेअर बाजारात घसरणीचा सिलसिला कायम

Patil_p

डिसेंबरपासून आरटीजीएस सुविधा 24 तास उपलब्ध

Patil_p

‘एअरपॉड मॅक्स’चे ऍपलकडून लाँचिंग

Omkar B

जीओनीची स्मार्टवॉचेस बाजारात

Patil_p

चिनी मोबाईल्सच्या वर्चस्वाला फटका

Omkar B

सायबर युद्धाच्या छायेत…भाग – 2

Patil_p
error: Content is protected !!