तरुण भारत

साताऱयात फ्लॅट फोडून लाखोंचे दागिने लंपास

विसावानाका येथील घटना, 3 लाख 70 हजार रुपयांचे दागिने चोरीस

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

बंद घर फोडून चोरी करण्याचा चोरटय़ांचा सिलसिला सातारा शहर परिसरात पुन्हा सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी राधिका रस्त्यावर बंद फोडून चोरटय़ांनी 1 लाख 90 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. दि. 11 रोजी याच घटनेची पुनरावृत्ती करत अज्ञात चोरटयांनी साताऱयातील विसावानाका परिसरात बंद फ्लॅट फोडून 3 लाख 70 हजार रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार सुषमा प्रकाश माने रा. अरुणोदय आर्केडस, विसावानाका, सातारा यांचा पार्लरचा व्यवसाय आहे. दि.11 रोजी 5.30 ते 12 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास त्या कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या.

त्याच वेळात अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या विसावा नाका, सातारा येथील अरुणोदय आर्केड, फ्लॅटच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी किचनमधील गोदरेजच्या कपाटात ठेवलेले सात तोळे वजनाचे सोन्याचे सुमारे 3 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. ही बाब लक्षात आल्यावर सुषमा माने यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.

Related Stories

शहीद संदीप सावंत अनंतात विलीन

Patil_p

सातारा : ५१३ जणांना डिस्चार्ज ; १८१ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

खेडमध्ये दोन वर्षानंतर जनावरांच्या कत्तलीची पुनरावृत्ती!

Patil_p

सातारा : कर्मचाऱ्यांनी “विशेष कोरोना यंत्रणेला” सहकार्य करावे : मनोज जाधव

Abhijeet Shinde

खुशखबर : ‘महालक्ष्मी’तून प्रवासासाठी सांगलीकरांना अतिरिक्त आरक्षण कोटा

Abhijeet Shinde

योगग्राम सांबरवाडीत घराघरात योगा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!