तरुण भारत

कोरोना मृतांच्या आकडय़ात घट

नवी दिल्ली

 गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा कमी झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. देशात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोरोनाच्या 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 17 हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मृतांचा आकडा कमी होण्याबरोबरच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासात देशभरात 16 हजार 946 नवे बाधित सापडले असतानाच 17 हजार 652 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 12 हजार 93 इतके बाधित रुग्ण सापडले आहेत. सक्रिय रुग्णसंख्येत घट झाल्याने आता देशात केवळ 2 लाख 13 हजार 603 इतके रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 51 हजार 727 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 कोटी 1 लाख 46 हजार 763 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

Advertisements

चीनमध्ये पुन्हा पसरतोय कोरोना

कोरोना विषाणूचा सर्वात पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनने कोरोनावर बऱयापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने एका प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Related Stories

दिलासा! छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दिल्लीत दाखल

pradnya p

समाज माध्यमे कायद्याच्या कक्षेत आणा

Patil_p

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘येथे’ पहिल्यांदाच फडकला तिरंगा

datta jadhav

हरियाणामध्ये 366 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 6634 वर

pradnya p

भारत – नेपाळ सीमेवार गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

pradnya p

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 6,798 नवे कोरोना रुग्ण; 157 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!