तरुण भारत

लसीकरणसंबंधी हेल्पलाईन जारी

नवी दिल्ली

 शनिवारपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या मोहिमेसंबंधी अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ‘1075’ हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हा क्रमांक चोवीस तास सुरू राहणार असून त्यावर कोरोना संसर्ग, लसीकरण मोहीम आणि को-विन ऍप्लिकेशनशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल.

Advertisements

लसीकरण मोहिमेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने करतील. या मोहिमेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 3,006 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळय़ानंतर दिवसभरात प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे देशात 3 लाख 600 जणांना लस दिली जाणार असल्याची माहिती गुरुवारी सरकारच्यावतीने देण्यात आली.

 ‘को-विन’ प्रणालीची नजर

संपूर्ण लसीकरण मोहीम ‘को-विन’ ऍप्लिकेशनच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. लसीकरणावर नजर ठेवणाऱया या अ‍Ÿपची ‘ड्राय रन’दरम्यानही चाचणी घेण्यात आली होती. ‘को-विन’ हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून कोरोना लसीकरणाच्या वेळेच्या व्यवस्थेवर नजर ठेवली जाणार आहे.

Related Stories

रुग्णांच्या रक्तनमुन्यात शिसे अन् निकेल धातू

Patil_p

निर्भया गुन्हेगारांची याचिका फेटाळली

tarunbharat

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नरीमन निवृत्त

Amit Kulkarni

अभिभाषणावर विरोधकांचे ‘बहिष्कारा’स्त्र

Amit Kulkarni

बिहार : तीन महिलांना डायन म्हणत जमावाकडून मारहाण, विवस्त्र करून काढली धिंड

Rohan_P

तिरुपती बालाजीला सोन्याची तलवार अर्पण

Patil_p
error: Content is protected !!