तरुण भारत

इंडोनेशिया : भूकंपात 60 घरांचे नुकसान, 7 ठार

ऑनलाईन टीम / जकार्ता : 

इंडोनेशियात स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. 6.2 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. प्राथमिक अहवालानुसार भूकंपाने 60 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. 

Advertisements

या भूकंपाचा केंद्रबिंदू माजेणे शहराच्या ईशान्य बाजूने 6 किमी अंतरावर नोंदवण्यात आला आहे. सुलावेसी शहरात भूकंपाने सर्वात जास्त नुकसान झाले आहे. एका दवाखान्याची इमारतही भूकंपात कोसळली असून, आरोग्य सेवक आणि काही रुग्ण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Related Stories

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

अफगाणींचे भवितव्य अंधकारमय

Patil_p

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला; 2 ठार

datta jadhav

निर्वासितांच्या नावाखाली दहशतवाद्यांना आश्रय मिळू नये – राष्ट्राध्यक्ष पुतिन

Abhijeet Shinde

सत्या नडेला आता मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष

Amit Kulkarni

4 प्रांतांमध्ये मृत्यू वाढले

Patil_p
error: Content is protected !!