तरुण भारत

वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी घटली

दुचाकी,तीनचाकी वाहनांचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोना विषाणूच्या महामारीच्या प्रभावामुळे वर्ष 2020 मध्ये भारताची वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षात भारताने 38,65,138 वाहनांची निर्यात केली आहे. तर 2019 मध्ये 47,63,960 वाहनांची निर्यात करण्यात आल्याची नोंद केली होती, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स यांच्या (सिआम)आकडेवारीतून देण्यात आली आहे.

देशातील वाहन निर्यात मोठय़ा प्रमाणात प्रभावीत होण्यास कोरोनासह विविध कारणे कारणीभूत ठरली आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रवासी वाहनांची निर्यात कमी झाल्याने हा परिणाम झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

याच दरम्यान प्रवासी वाहनांची निर्यात वर्षभरच्या अगोदर 7,06,159 युनिटच्या तुलनेत 39.38 टक्क्यांनी घटून 4,28,098 युनिटवर आली आहे. याचदरम्यान प्रवासी कार्सची निर्यात 47.89 टक्क्यांनी घटून 2,76,808 राहिली होती. 2019 मध्ये प्रवासी कार्सची निर्यात मात्र 5,31,226 इतकी झाली होती.

डिसेंबर 2020 मध्ये तेजी

देशातील प्रवासी वाहनांची विक्री डिसेंबर 2020 मध्ये 13.59 टक्क्यांनी वधारुन 2,52,998 युनिटवर राहिली आहे. यामुळे आगामी काळातही यामध्ये तेजी वाढत जाण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.

प्रभावीत वाहनांचा वर्ग

सर्वसाधारण या कालावधीत स्कूटरची निर्यात 3,72,025युनिटवरुन 37.28 टक्क्यांवर घसरुन 2,33,327 युनिटवर आली आहे. मोटरसायकलची निर्यात 2020 मध्ये 9.87 टक्क्यांनी घटली आहे. याचदरम्यान तीनचाकी वाहनांची निर्यात 27.71 टक्क्यांनी कमी होत, 3,82,756 वर स्थिरावल्याची माहिती आहे. तसेच  एकूण व्यावसायिक वाहनांची निर्यात 2019 मध्ये 70,702 होती याच्या तुलनेत 2020 मध्ये मात्र निर्यात 36.80 टक्क्यांनी घटल्याची नेंद केली आहे.

Related Stories

महिंद्रा एक्सयूव्ही 700ला मिळाले फाईव्ह स्टार रेटिंग

Amit Kulkarni

कियाची सोनेट 18 ला होणार लाँच

Patil_p

नवी आय ट्वेंटी 5 नोव्हेंबरला येणार

Patil_p

मर्सिडीज बेंझची ‘E 350d’ भारतात दाखल

prashant_c

एमजी मोटर्सची ऍस्टर याच महिन्यात

Amit Kulkarni

स्मार्टफोन कंपनी शाओमी कार निर्मितीत उतरणार

Patil_p
error: Content is protected !!