तरुण भारत

एल अँड टीला मिळाले कंत्राट

नवी दिल्ली

 पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात पाया रोवलेल्या एल अँड टी कंपनीला स्थानिक स्तरावर कंत्राटे मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. नवनवीन कंत्राटे मिळवण्यात कंपनीला यश मिळते आहे. अलीकडच्या काळात अनेक कंत्राटे कंपनीने पदरात पाडून घेतली आहेत.विविध प्रकल्पांच्या कंत्राटाचे मूल्य 1000 ते 2500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते. मुंबईतील एका बांधकाम क्षेत्रातील विकासकाने कार्यालय उभारणीचे कंत्राट दिले आहे. यासोबत हरियाणामध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व इस्पितळाचे कामही कंपनी करणार आहे. 15 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर सदरची इमारत बांधली जाणार आहे. याशिवाय रेल्वेकडूनही बांधणीचे कंत्राट मिळाले आहे.

Advertisements

Related Stories

2020 मध्ये फ्लिपकार्टला सव्वातीन हजार कोटींचा तोटा

Patil_p

भारत मार्केट योजनेचे सादरीकरण

Patil_p

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat

टाटाच्या या कंपनीने दिले लाखाचे 13 लाख

Patil_p

हॉनरचा गेमिंग लॅपटॉप लवकरच बाजारात

Patil_p

टाटा मोर्ट्सच्या प्रवासीवाहनांच्या किमती महागणार

Patil_p
error: Content is protected !!