तरुण भारत

आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स कोसळला

निफ्टी 14,450 अंकांच्या खाली ः इन्फोसिस- एचडीएफसी, आयसीआयसीआयमध्ये विक्री

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

मागील काही दिवसांपासून तेजीचा प्रवास सुरु असणाऱया भारतीय शेअर बाजारात तेजीचा प्रवास खंडित करुन चालू आठवडय़ातील शेवटय़ाच्या दिवशी
शुक्रवारी 549 अंकांची मोठी घसरण राहिली आहे. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बजारातील घसरणीच्या प्रभावामुळे देशातील शेअर बाजार प्रभावीत झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये इन्फोसिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागातील विक्रीमुळे शेअर बाजार दबवासह घसरुन बंद झाला आहे.

दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्समध्ये 549 अंकांची घसरण राहिली आहे. उच्चांकीपातळीवर झालेल्या नफाकमाईमुळे शेअर बाजारात चढउतार राहिला होता.  शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 549.49 अंकांनी घसरुन निर्देशांक 49,034.67 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 161.90 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 14,433.70 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्स मधील टेक कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी घसरले आहेत. एचसीएल टेक, ओएनजीसी, एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसीचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, आयटीसी, बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र तेजीसोबत बंद झाले आहेत.

अन्य घडामोडीचा प्रभाव

चीन आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा प्रकोपातून वाचण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा लावला जाण्याचे संकेत व्यक्त होत आहेत. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर पडल्याने सेन्सेक्स मोठय़ा संख्येने कोसळला आहे. दुसरीकडे देशात लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे उद्योग क्षेत्रासह अन्य प्रमुख घटकांची अपेक्षा मोठय़ा प्रमाणात उत्सुकता अर्थसंकल्पाकडे लावून राहिली आहे. सदरच्या गोष्टीचाही देशातील शेअर बाजारावर काही प्रमाणात प्रभाव राहण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजरांमध्ये प्रामुख्याने आशियाई बाजारात चिनचा शांघाय कम्पोजिट तसेच हाँगकाँगचा हँगसेंग लाभात राहिले आहे. अन्य शेअ बाजारापैकी दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

Related Stories

पुढील वर्षी सिंगापूर येथे ‘डब्लूइएफ’ची होणार बैठक

Patil_p

9 कंपन्यांचे बाजार भांडवल घटले

Patil_p

मद्याची ऑनलाईन विक्री करण्याची मागणी

Patil_p

एटीएफ इंधन दरवाढीचा भार विमानप्रवाशांवर

Amit Kulkarni

सेन्सेक्स 86 अंकांच्या मजबुतीने सावरला

Omkar B

सेवा क्षेत्रात परतली तेजी

Patil_p
error: Content is protected !!