तरुण भारत

अडूरमध्ये प्रौढाची आत्महत्या

प्रतिनिधी/गुहागर

तालुक्यातील अडूर येथील 57 वर्षिय प्रौढाने अडूरमधील नारायण मंदिराच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजता घडली. मतदान नसतानाही आपल्या उमेदवाराला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या या प्रौढाच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.

Advertisements

संजय दत्तात्रय केळकर हे व्यवसायानिमित्त नाशीक येथे रहात होते. अडूर ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लागला होता. येथील उमेदवार उमेश आरस आहेत. मात्र आपले मतदान नसतानाही केळकर हे नाशीकवरून 15 जानेवारी रोजी अडूर येथे आले होते. सकाळी आरस यांना शुभेच्छा देण्यासाठी ते बाहेर पडले. त्यांना भेटून परत येताना त्यांनी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. मतदान प्रक्रिया सुरू होती. यामुळे मतदार नारायण मंदिराच्या विहिरीजवळून ये-जा करत होते. दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेला या विहिरीच्या कठडय़ावर मोबाईल व चष्मा दिसला. यामुळे तिने विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता विहिरीत केळकर यांचा मृतदेह तरंगताना दिसला. तिने तातडीने आजूबाजूच्या मंडळींना याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांचे भाऊ राजेंद्र केळकर हे चिपळुणात वास्तव्यास आहेत. त्यांना याबाबत खबर देण्यात आली. त्यानंतर ते तातडीने येथे दाखल झाले व त्यांनी आपल्या भावाच्या आत्महत्येची खबर गुहागर पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश कादवडकर करत आहेत.

Related Stories

फक्त देवगडची सुनावणी पूर्ण

NIKHIL_N

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्याची 3 वर्षाने मिळाली नुकसान भरपाई

Patil_p

शाळा सुरू करणे काळाची गरज- वामन तर्फे

Ganeshprasad Gogate

इ पीक पाहणी व नोंदणी अभियानाची आंबोली मंडळात प्रभावी अंमलबजावणी

NIKHIL_N

मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकावरचे आरक्षण स्वीकारावे

Patil_p

मालवणात महावितरणची इमारत धोकादायक

NIKHIL_N
error: Content is protected !!