तरुण भारत

झिओमी, स्कायरीझॉन काळय़ा सूचीत

चीनविरोधात अमेरिकेचे कठोर पाऊल

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

झिओमी, स्कायरीझॉन, सीएओओसी आदी चीनी कंपन्यांना अमेरिकेने काळय़ा सूचीत स्थान दिले आहे. यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढीला लागेल, असा धमकी चीनने दिली असून दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या कंपन्यांमधून अमेरिकेच्या कंपन्यांनी त्यांचा हिस्सा काढून घ्यावा असा आदेश अमेरिकेच्या संरक्षण विभागाने काढला आहे. त्याचे क्रियान्वयन दोन महिन्यांमध्ये करावे लागणार आहे. झिओमी ही जगातील तिसऱया क्रमांकाची मोबाईल निर्मिती करणारी कंपनी मानली जाते. आता काळय़ा सूचीत गेल्याने या कंपनीला अमेरिकेच्या गुगल कंपनीशी संबंध तोडावे लागणार असून गुगल कंपनीची सेवा घेता येणार नाही. चीनच्या दूरसंचार कंपन्यांबरोबरच चीनच्या राष्ट्रीय तेलसंशोधन कंपनीलाही काळय़ा सूचीत टाकण्यात आले आहे. सीएनओसीसी या नावाने ओळखली जाणारी ही कंपनी जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी कंपनी असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने टीका केली आहे.

Related Stories

ब्राझीलमधील कोरोनाबळींची संख्या 80 हजारांवर

datta jadhav

टय़ुनीशियाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच महिलेची निवड

Amit Kulkarni

रॉन क्लेन होणार व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ

Patil_p

रशियात मॅकेनिककडून ‘ड्रगन कार’ची निर्मिती

Patil_p

एच-1बी व्हिसा स्थगित करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार

datta jadhav

ISIS-K च्या निशाण्यावर पाकिस्तान

datta jadhav
error: Content is protected !!