तरुण भारत

ब्रुनो फर्नांडिस चौथ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

वृत्तसंस्था/ लंडन

मँचेस्टर युनायटेड क्लब संघातील मध्यफळीत खेळणाऱया पोर्तुगालचा ब्रुनो फर्नांडिसची डिसेंबर महिन्यातील प्रिमियर लीगचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड झाली आहे. गेल्या जानेवारीमध्ये ब्रुनो फर्नांडिसने मँचेस्टर युनायटेड संघाबरोबर करार केला होता, त्यानंतर चौथ्यांदा त्याला हा बहुमान मिळाला आहे.

Advertisements

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर युनायटेड संघाला पहिल्या स्थानावर घेऊन जाण्याकरिता फर्नांडिसचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. येत्या रविवारी या स्पर्धेतील मँचेस्टर युनायटेडचा सामना लिव्हरपूल संघाबरोबर होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या कालावधीत या स्पर्धेतील झालेल्या सहा लीग सामन्यांमध्ये फर्नांडिसने मँचेस्टर युनायटेडतर्फे तीन गोल नोंदविले. त्यापैकी मँचेस्टर युनायटेडने चार सामने जिंकले असून दोन सामने बरोबरीत राखले. 26 वषीय ब्रुनो फर्नांडिसने चालू फुटबॉल हंगामात विविध स्पर्धांमध्ये पंधरा गोल नोंदविले आहेत. एका वर्षाच्या फुटबॉल हंगामामध्ये चार वेळा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान मिळविणारा ब्रुनो फर्नांडिस हा पहिला फुटबॉलपटू आहे. त्याने 2020 च्या फेब्रुवारी, जून आणि नोव्हेंबर महिन्यात हे पुरस्कार संपादन केले होते.

Related Stories

रवि शास्त्रीसह प्रशिक्षक स्टाफचे दुबईत आगमन

Patil_p

स्वित्झर्लंडला महिला नेमबाजीत प्रथमच सुवर्ण

Patil_p

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाइन; भाऊ स्नेहाशीष यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

डरेन गॉ पंचगिरी करणार नाहीत

Amit Kulkarni

भारताचे दोन ऍथलिट उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p

रोनाल्डोच्या सर्वोत्तम पाच फुटबॉलपटूमध्ये ख्रिस्टीयानोला स्थान नाही

Patil_p
error: Content is protected !!