तरुण भारत

कंटेनरची वाहनांना धडक; अपघातात तिघांचा मृत्यू

वळसंगमध्ये अपघात, कुंभारी गावात रास्ता रोको

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग, कुंभारीदरम्यान कंटेनर चालकाने तीन ते चार वाहनांना धडक देत कंटेनर वेगाने चालविला. यामध्ये झालेल्या अपघातात वळसंग येथे दोघांचा व कुंभारी येथे एकाचा मृत्यू झाला तर तीन ते चारजण जखमी झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

तरुणांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने दोघेही जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे सकलेन महमद कासीम कुरेशी (वय 20), रोहित बाळू चौगुले (वय 23) अशी असून दोघेही वळसंगमधील रहिवासी आहेत. या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. व एका मृताची ओळख पटली नाही. कुंभारी येथील सुभाष इरप्पा छपेकर (वय 50) हे जखमी झाले.

कंटेनर हा अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. या कंटेनरचालकाने रस्त्यात येताना दुचाकी, कार व एसटी या वाहनांना ठोकरून वाहन वेगाने निघाले होते. वळसंग येथे काही जणांना ठोकरून वाहन कुंभारी या ठिकाणी दुचाकीला धडकून कमानीवर आदळले. यामध्ये दोन ते तीनजण जखमी झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, फौजदार अजय हंचाटे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर कुंभारी येथे रास्ता रोको करण्यात आला.

Related Stories

सोलापूर : आ.संजयमामा शिंदे कोरोना पॉझिटिव्ह

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये 4 जणांचा मृत्यू, 152 नवे कोरोना रुग्ण

triratna

सोलापूर : शिवसेनेचे नेते अनिल परबच हप्तेखोर, जाऊन केबलवाल्यांना विचारा : बाळा नांदगावकर

triratna

सोलापूर : बंद दुकानचे शटर तोडून ३२ हजार लंपास

triratna

सोलापूर जिल्ह्यात २३३ कोरोना रुग्णांची भर

triratna

सोलापूर: नई जिंदगी परिसरात खून

triratna
error: Content is protected !!