तरुण भारत

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

ऑनलाईन टीम / पुणे : 


खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे.

Advertisements

 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील या राज्य निपुणता केंद्रामध्ये ॲथलेटिक्स, शूटिंग व सायकलिंग या तीनही ऑलिंपिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रति खेळ 30 खेळाडूंना या केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या केंद्रासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर देखील मंजूर करण्यात आल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Stories

प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

Abhijeet Shinde

मुळा-मुठाच्या नदीपात्रात तुटलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती

Rohan_P

सचिन फोलाने यांची भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

Rohan_P

नारायण राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Abhijeet Shinde

देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय ; हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपची टीका

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!