तरुण भारत

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

दिल्ली/प्रतिनिधी

गोव्यात आजपासून इफ्फीची सुरुवात होणार आहे. यापार्श्ववभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी २०२१ हा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक तसेच सामाजिक उत्सवही आहे, असे मत व्यक्त केले.

“कोविड-१९ महामारीचे संकट असतांनाही इफ्फीमध्ये जगभरातून २०० पेक्षा जास्त चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या आहेत. या महोत्सवात अनेकविध विषयांवरील चित्रपट दाखवले जातील आणि रसिकांना उत्तमोत्तम चित्रपटांची पर्वणी अनुभवता येईल. पहिल्यांदाच हा महोत्सव मिश्र म्हणजेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात होत असल्यामुळे अनेकांना ऑनलाईन माध्यमातून महोत्सवात सहभागी होता येईल, असं जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

सर्व चित्रपट पणजी आणि आसपासच्या सात चित्रपट गृहांमध्ये दाखवले जातील तसेच कोविड प्रतिबंध विषयक सर्व प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. आलेल्या प्रवेशीकांमधून चित्रपटांची निवड करण्याचं अवघड काम ज्युरींनी उत्तमरित्या केलं असंही जावडेकर म्हणाले.

चित्रपट रसिकांनी प्रत्यक्ष येऊन या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गोव्यात महोत्सवासाठी येणाऱ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असेही ते म्हणाले.

५१ व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी इंडिया आणि डीडी नॅशनल वाहिन्यांवरून केले जाणार आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. या सोहळ्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पत्र सूचना कार्यालयाच्या यु ट्यूब चॅनेलवरून केले जाईल.

Advertisements

Related Stories

व्हाईट हाऊसमध्ये महिला सशक्तीकरण

Patil_p

जेईई, नीट परीक्षा जुलैमध्ये होणार

Patil_p

आसगाव, हणजूण वासियांचा म्हापसा पाणी विभागावर घागर मोर्चा

Patil_p

विद्यार्थिनीचा मानसिक छळ करीत असल्याचा मुख्याध्यापिका, चेअरमन विरुद्ध तक्रार

Patil_p

पिकानंतरच्या क्रांतीची आवश्यकता – मोदी

Patil_p

ऑन लाईन फसवणूकप्रकरणी पोलीस कोठडी

Patil_p
error: Content is protected !!