तरुण भारत

जगभरात कोरोनाबळींनी ओलांडला 20 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगभरात कोरोनाबळींच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जगात आतापर्यंत 9 कोटी 43 लाख 76 हजार 856 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 20 लाख 19 हजार 298 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 6 कोटी 74 लाख 03 हजार 457 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 2 कोटी 49 लाख 54 हजार 101 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 1 लाख 11 हजार 435 केसेस गंभीर आहेत. 

Advertisements

वर्ल्डोमीटरनुसार, कोरोना रुग्णवाढीची आणि मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 41 लाख 02 हजार 429 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 4 लाख 01 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात 1 कोटी 05 लाख 43 हजार 659 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 52 हजार 130 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाबळींच्या संख्येत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 83 लाख 94 हजार 253 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 02 लाख 08 हजार 291 जण दगावले आहेत. 

Related Stories

कतार कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याच्या तयारीत

Amit Kulkarni

कोरोनामुळे दुसऱयांदा मातृत्व नाकारत आहेत न्यूयॉर्कमधील माता

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 57 लाख 49 हजार 007 वर

Rohan_P

एअर इंडियासाठी अडचण

Patil_p

लसीसाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

datta jadhav

40 वर्षांनी नेपाळला पृथ्वीच्या कक्षेत स्थान

Patil_p
error: Content is protected !!