तरुण भारत

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.79 %


ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 18 लाख 84 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.79 % आहे. 

Advertisements


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 2,910 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 87 हजार 678 वर पोहचली आहे. सध्या 51 हजार 965 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 52 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 388 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.54 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 37 लाख 43 हजार 486 नमुन्यांपैकी 19 लाख 87 हजार 678 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 24 हजार 705 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 2 हजार 037 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

जगात सर्वाधिक आव्हाने भारतीय सैन्यासमोर

Amit Kulkarni

पुण्यातील खाजगी सावकार महिलेच्या तावडीतून सुटका करा

Patil_p

साताऱ्यात वाढत्या कोरोनामुक्तीने भीती कमी होतेय

Abhijeet Shinde

ममता वादळ थांबता थांबेना ; अल्पन बंडोपाध्याय यांची केली मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

Abhijeet Shinde

भारताचा जवळचा मित्र रशियानं तालिबान्यांचं केलं कौतुक

Abhijeet Shinde

गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा लागू केले जातील…

datta jadhav
error: Content is protected !!