तरुण भारत

सातारा : उद्या गुलाल कोणाचा?

सातारा / प्रतिनिधी :   

सातारा जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात 11 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे. 

Advertisements

गुलाल कोणाच्या अंगावर पडणार, कोणाची गावातून मिरवणूक निघणार याकडे नजरा असल्या तरीही कोरोनाच्या अनुषंगाने अशा मिरवणूका काढणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नरज असणार आहे.

सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी छत्रपती शाहु क्रीडा संकुलात, कोरेगाव तालुक्यातील इंडोअर स्पोर्टस हॉल डी.पी.भोसले कॉलेज, जावली तालुक्यातील जावली तहसील कार्यालयात, वाई तालुक्यातील वाई तहसील कार्यालयात, महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात, खंडाळा येथील किसनवीर सभागृह पंचायत समिती खंडाळा येथे, फलटण तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम फलटण येथे, माण तालुक्यात नवीन शासकीय गोदाम दहिवडी, खटाव तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारत वडूज, कराड तालुक्यात रत्नागिरी शासकीय धान्य गोदाम भेदा चौकात, पाटण तालुक्यात बाळासाहेब देसाई कॉलेजच्या क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. त्याकरीता आज प्रशिक्षण देण्यात आले.

सातारा तालुक्यातील 89 ग्रामपंचायतींच्या 16 टेबलवर होणार मतमोजणी
सातारा तालुक्यातील मतमोजणी ही सोळा टेबलवर आठ फेऱ्यात होणार आहे. टेबल एकवर समर्थगाव, सासपडे, शेंद्रे, वळसे, यवतेश्वर, टेबल क्र. 2 वर निगडी तर्फ सातारा, कण्हेर, गवडी, संगममाहुली, कारंडवाडी, गजवडी, टेबल क्रमांक 3 वर पांगारे, शेळकेवाडी, डोळेगाव, परळी, सोनापूर, निसराळे, वेचले, टेबल क्रमांक 4 वर पिलाणी, बोरगाव, फत्यापूर, फडतरवाडी, वर्ये, वेळे, नागेवाडी, टेबल क्रमांक 5 – सोनगाव सं निंब, वावदरे, कळंबे, नागठाणे, टेबल क्रमांक 6 वर खोडद, पाडळी, मांडवे, निनाम, अतित, टेबल क्रमांक 7 वर समर्थनगर, माजगाव, लांडेवाडी, वेणेगाव, कुसवडे, मापरवाडी, डबेवाडी, टेबल क्रमांक 8 वर सांबरवाडी, आवाडवाडी, वर्णे, अंगापूर वंदन

तर टेबल क्रमांक 9 तासगाव, चिंचणेर वंदन, नेले, कोंडवे, टेबल क्रमांक 10 – हामदाबाज, सारखळ, वासोळे, वाढे, बसाप्पाचीवाडी, टेबल क्रमांक 11 – महागाव, गोवे, आंबळे रायघर, ठोसेघर, खडगाव, लावंघर, टेबल क्रमांक 12 – करंडी, पोगरवाडी, पेट्री अनावळे, कोडोली, टेबल क्रमांक 13 – धनगरवाडी, मुग्दुलभटाचीवाडी, राकुसलेवाडी, कुमठे, पाटेश्वरनगर, धनगरवाडी, टेबल क्रमांक 14 – जावळवाडी, किडगाव, नुने, इंगळेवाडी, आगुंडेवाडी, सैदापुर, टेबल क्रमांक 15- शिवथर, वनगळ, यादववाडी, सोनवडी, चिखलीटेबल क्रमांक 16 – रेवंडे, निगुडमाळ, काळोशी, शिंदेवाडी, दरे तर्फ परळी, परमाळे, नांदगाव, भैरवगड यांची मतमोजणी होणार आहे.

Related Stories

सातारा : स्वीकृतपदी बाळासाहेब ढेकणे यांचीच निश्चिती?

datta jadhav

सलग आठव्या दिवशीही बाधित वाढ शंभरच्या खाली

datta jadhav

पोवईनाका परिसरात युवकांमध्ये तुंबळ मारामारी

Patil_p

सातारा : कोरोना नियम उल्लंघन हॉटेल मालकास पडले महागात

Abhijeet Shinde

ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार

Patil_p

लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत पितापुत्राचा दुर्दैवी मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!