तरुण भारत

सांगली : आष्ट्यात सोमवारी शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन

आष्टा / वार्ताहर

आष्टा येथे शिवसेनेतर्फे आज सोमवार दिनांक 18 रोजी पालिकेसमोर बुरखा फाडो आंदोलन करणार असल्याची माहिती आष्टा पालिकेचे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी दिली.

वीर कुदळे म्हणाले, आष्टा नगरपरिषदेने गेल्या चार वर्षात 33 टन जंतुनाशक पावडर, धूर व जंतुनाशक फवारणी मशीनवर 20 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. एवढा खर्च करूनसुद्धा शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हिवताप व कोरोनासारख्या अन्य संसर्गजन्य रोगांमुळे शेकडो निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. तसेच स्वच्छता मोहीम देशोधडीला लावणाऱ्या भ्रष्ट प्रशासन व सत्ताधारी यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन करणार आहोत.

Advertisements

शहरात अनेक समस्या कायम आहेत. आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याकडे सत्ताधारी गटाचे तसेच पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, तरीही मिळेल त्या गोष्टी मध्ये पैसे खाण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील जनता त्रस्त असताना पालिका प्रशासन व सत्ताधारी नेते सुस्त आहेत. येथील जनतेच्या समस्येचे काहीही देणे घेणे त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे आपण बुरखा फाडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तरी स्वाभिमानी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वीर कुदळे यांनी केले.

या आंदोलनात नगरसेविका वर्षा अवघडे, शिवसेना शहरप्रमुख राकेश आटूगडे, संघटक नंदकुमार आटूगडे,शहरप्रमुख गणेश माळी,विद्यार्थी सेना प्रमुख स्वप्नील माने,महिला आघाडी प्रमुख अर्चना माळी, भाजपा नेते डॉ.सतीश बापट, दिलीप कुरणे, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Related Stories

ग्रामीण भागात बोगस इस्टेट सर्व्हेच्या माध्यमातून लाखोंची लूट सुरु… ?

triratna

सांगली : गाढवाची वरात महावितरणच्या दारात

triratna

यशवंतरावांच्या विचारानेच महाराष्ट्राची यशवंत वाटचाल – नाना पटोले

triratna

बजेटच्या आडून काही राज्यांचा निवडणूक वचननामा – जयंत पाटील

triratna

बुधगावच्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी

triratna

“अनिकेतचा मृतदेह माझ्या समोर जाळला” अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष

triratna
error: Content is protected !!