तरुण भारत

ब्रिटनमध्ये पैशांचे झाड, सर्वांची मनोकामना करते पूर्ण

एखादे मूल जेव्हा स्वतःच्या आईवडिलांकडे पैशांचा हट्ट करते, तेव्हा त्याचे आईवडिल त्याला पैसे झाडावर उगवत नसल्याचे सांगतात. परंतु जगात एका झाडावर खरोखरच पैसे उगवतात. प्रत्यक्षात ग्रेट ब्रिटनमधील एका झाडामधून हजारोंच्या संख्येत नाणी बाहेर पडली आहेत. हे झाड तेथील पीक डिस्ट्रिक्टमध्ये आहे. हे झाड काही 10 किंवा 20 वर्षांचे नसून 1700 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. पण ही नाणी या झाडामधून उगवली नसून लोकांनी तेथे रोवली आहेत. या झाडावर केवळ ब्रिटनची नव्हे तर जगभरातील देशांची नाणी दिसून येतात.

हे अनोखे झाड वेल्सच्या पोर्टमेरियन गावात असून हे ठिकाण आता प्रसिद्ध पर्यटनस्थळ ठरले आहे. या झाडावर नाणी रोवण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येत आहेत. या झाडावर आता नाणी रोवण्यासाठी जागाच उरलेली नाही. या झाडावर नाणी ठेवल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरात सुख-समृद्धी येते, असे अनेकांचे मानणे आहे. या झाडात एखाद्या दैवीशक्तीचा वास असल्याचीही वदंता आहे. नाताळावेळी या झाडानजीक मिठाई आणि भेटवस्तू ठेवल्या जातात. प्रेमी जोडपे नात्यात मधुरपणा येण्यासाठी येथे नाणी ठेवतात.

Related Stories

अनंतनागमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

datta jadhav

‘ऍपल’चा चीनला झटका, भारताचा लाभ

Patil_p

उत्तराखंड : कोरोनाग्रस्त रुग्णांनी ओलांडला 31 हजारांचा टप्पा

pradnya p

चर्चेदरम्यान चीनने वाढविले सैनिक

Patil_p

उत्तर प्रदेश : दाट धुक्यामुळे कंटेनर आणि बसचा भीषण अपघात; 4 जण ठार

pradnya p

तेलंगणात आग दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!