तरुण भारत

एक कोटी लाचप्रकरणी रेल्वे अधिकाऱयाला अटक

सीबीआयकडून देशात 20 ठिकाणी छापासत्र

नवी दिल्ली, गुवाहाटी / वृत्तसंस्था

केंद्रीय अन्वेषण विभागाने रविवारी लाच घेताना भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा विभागातील वअधिकाऱयास अटक केली. प्राप्त माहितीनुसार एक कोटी रुपयांची लाच घेताना अधिकाऱयाला अटक झाली आहे. अटकेच्या कारवाईबरोबरच सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित देशातील विविध 20 ठिकाणी छापासत्र सुरू केले आहे. तपास अधिकाऱयांकडून बेहिशेबी मालमत्तेची तपासणी केली जात आहे.

ईशान्य सीमेवरील रेल्वे (एनएफआर) प्रकल्पांच्या करारासाठी लाच घेत असताना सीबीआयने 1985 च्या तुकडीचे आयआरईएस अधिकारी महेंद्रसिंग चौहान यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे अधिकारी सध्या आसामच्या मलिगाव येथील एनएफआर मुख्यालयात कार्यरत होते. त्यांनी घेतलेली एक कोटी रुपयांची रक्कम तपास यंत्रणांना सापडली आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर आता तपास अधिकाऱयांनी दिल्ली, आसाम, उत्तराखंड आणि अन्य दोन राज्यांमध्ये छापासत्र सुरू केले आहे. एकाचवेळी जवळपास 20 ठिकाणी छापासत्र सुरू असले तरी पुढील कारवाईबाबत अधिक माहिती तपास यंत्रणांनी दिलेली नाही.

दुसरी मोठी कारवाई

तपास यंत्रणांनी यापूर्वी गेल्या ऑक्टोबर महिन्यात 2.73 कोटीची लाच घेताना  भारतीय रेल्वेचे विभाग अभियंता अनिल अहिरवार यांना अटक केली होती. मुंबईच्या गुन्हा शाखेने ही कारवाई केली होती. निविदा काढण्याशी संबंधित एका प्रकरणात अहिरवार यांच्यासह अन्य चार अधिकाऱयांनी गुजरातच्या एका व्यावसायिकाकडून लाच घेतली होती. रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱया पाईप खरेदीची निविदा मिळविण्यासाठी 2.73 कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

Related Stories

सावरकरांना राजकारणात ओढू नका!

Patil_p

भारताचा चीनला दणका : भारतीय रेल्वेने केले आणखी एक कंत्राट रद्द

triratna

‘या’ राज्यात आता 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

pradnya p

बंगाली अभिनेत्री पायल सरकार भाजपमध्ये सामील

Amit Kulkarni

उत्तराखंडात 928 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 45,332 वर

pradnya p

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

datta jadhav
error: Content is protected !!