तरुण भारत

दक्षिण आफ्रिकेचा संघ चार्टर विमानाने पाकमध्ये दाखल

वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग

तब्बल 14 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर कराचीत दाखल झाला आहे. या दौऱयासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाककडे घेऊन जाण्यासाठी व्यावसायिक विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. पण कोरोना महामारी प्रतिबंधक नियमामुळे हे विमान रद्द केल्याने शेवटच्या क्षणी चार्टर विमानाची सोय करण्यात आली.

Advertisements

कराचीमध्ये शनिवारी चार्टर विमानाने दक्षिण आफ्रिकेचा 21 जणांचा संघ दाखल झाला. उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. पहिली कसोटी 26 जानेवारीपासून सुरू होईल. कोरोना समस्येमुळे हवाई प्रवास करताना अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पाकचा दौरा संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेत होणार असून या मालिकेबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ही मालिका कदाचीत मार्च महिन्यात खेळविली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

आयपीएल संघाच्या नेतृत्वासाठी डीव्हिलियर्सची धोनीला पसंती

Patil_p

पुढील महिन्यात बीसीसीआयची निवडणूक

Patil_p

नौकानयनपटू नेत्राला कांस्यपदक

Patil_p

बेनकनहळ्ळीत रंगले दहावी बॅचेसचे क्रिकेट!

Patil_p

आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याची क्षमता कोहलीच्या टीम इंडियाकडे : लारा

Patil_p

हॅट्ट्रिक विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीसमीप

Patil_p
error: Content is protected !!