तरुण भारत

राष्ट्रीय महिला कुस्ती निवड चाचणीत कोल्हापूचा दबदबा

फिरोज मुलाणी /  पुणे

रविवारी झालेल्या महिला वरिष्ठ महिला निवड चाचणीत कोल्हापूरच्या महिला मल्लांनी ठसा उमटवला.  आग्रा (उत्तरप्रदेश)  येथे  23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती होणार आहे. आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदे, भाग्यश्री फंड या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

Advertisements

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने रविवारी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र (कात्रज) येथे कोरोनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करून निवड चाचणी स्पर्धा पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, तांत्रिक सचिव प्रा. बंकट यादव, ललित लांडगे, शेखर शिंदे, गणेश कोहळे, भरत मेकाल उपस्थितीत होते.

30 ते 31 जानेवारी अखेर आग्रा येथे राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा होणार आहे. गेल्या आठवडय़ात झालेली मुलांची आणि रविवारी पार पडलेली महिला निवड चाचणी ही पुढील काळात होणाऱया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची रंगीत तालीम मानली जात होती. मात्र कुस्तीगीर परिषदेने अटी शर्थीचे पालन करून निवड चाचणी यशस्वी पार पाडली.

 महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या चाचणीतून निवडलेला महाराष्ट्र संघ खालील प्रमाणे 

50  किलो स्वाती शिंदे (कोल्हापूर) 

53 किलो नंदिनी साळोखे (कोल्हापूर) 

55 किलो  दिशा कारंडे (कोल्हापूर) 

57 किलो विश्रांती पाटील (कोल्हापूर)    

59 किलो अंकिता शिंदे (कोल्हापूर) 

62 किलो भाग्यश्री फंड (अहमदनगर) 

65 किलो सृष्टी भोसले (कोल्हापूर) 

68 किलो ऋतुजा संकपाळ (कोल्हापूर) 

72 किलो प्रतीक्षा बागडी (सांगली) 

76 किलो पौर्णिमा सातपुते (कोल्हापूर) 

 सर्व यशस्वी महिला कुस्तीगीराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध

Patil_p

जिल्ह्यात सरासरी 18.3 मि.मी. पाऊस

datta jadhav

सांगली : बागणीच्या युवकाने बनवले सोशल डिस्टन्स उल्लंघनावेळी सतर्क करणारे उपकरण

Abhijeet Shinde

केरळचे सोने चोरी कनेक्शन साताऱ्यात

datta jadhav

कोल्हापूर : नवीन 19 कोविड केअर सेंटरची उभारणी

Abhijeet Shinde

आत्मनिर्भर योजना झाली बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!