तरुण भारत

घाणेखुंट ग्रामपंचायत परिसर दीडशेहून अधिक एलईडी पथदीपांनी उजळला!

वार्ताहर/ लोटे

खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या हद्दीत 150हून अधिक एलईडी पथदीप बसवण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोग फंडातून महावितरणच्या वीज खांबांवर हा प्रकल्प राबवण्यात आला.

  ग्रा. पं.च्या हद्दीतील जि. प. रस्ते, वाडय़ांतर्गत रस्ते, मंदिरे, मशिदी, शाळा, सार्वजनिक ठिकाणी हे पथदीप लावण्यात आल्याने परिसर रोषणाईने उजळून गेला आहे. घाणेखुंट गाव औद्योगिक वसाहतीजवळ असल्याने गावातील बहुतांशी कामगार व परप्रांतीय कामगार वसाहतीत कामे करत आहेत. तसेच गावातील रस्त्यांवर रात्री-अपरात्री वाहनांची वर्दळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे पथदीप लावण्यात आल्याचे सरपंच अंकुश काते यांनी सांगितले.

Related Stories

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतली कोरोना लस

NIKHIL_N

आंबोली पोलीस चौकी आजरा फाटय़ावर न्या

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोली येथील अभय भास्कर कर्वे यांचे निधन

Shankar_P

लॉकडाऊन काळात केज कल्चरचा आधार

NIKHIL_N

कोणाचीही वीज तोडू नका

NIKHIL_N

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, अधिकाऱयाचा अटकपूर्व जामीन फेटाळला!

Patil_p
error: Content is protected !!