तरुण भारत

जिल्हा न्यायालय ते भाटय़े पूल रस्त्याची दुरवस्था

प्रतिनिधी/ रत्नागिरी

पावसाळ्यानंतर शहरातील काही ठराविक ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे सोडल्यास शहरामध्ये असंख्य ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे शहरवासीयांमधून संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत़

   जिल्हा न्यायालय ते भाटय़े पुलापर्यंतचा रस्ता हा विविध कामांसाठी खोदण्यात आल्यामुळे तसेच पावसामुळे पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येत आह़े  काही दिवसापूर्वी येथे पाणी योजना व इतर कारणांसाठी रस्ता खोदण्यात आला होत़ा मात्र खोदकाम केलेल्या रस्त्याचा भाग डांबराच्या सहाय्याने बुजवण्यात आला, मात्र अन्य ठिकाणचे खड्डे तसेच ठेवण्यात आल्यामुळे वाहनचालकांसह स्थानिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़ खड्डे वाचवण्याच्या नादामध्ये येथे अपघात होण्याची शक्यता आह़े त्याम्gाळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिकांसह वाहनधारकांमधून होत आह़े

   तसेच साईडपट्टया खोदून ठेवण्यात आल्यामुळे बस व इतर अवजड वाहनांमुळे येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहेत़ दोन्ही मोठी वाहने समोरासमोर आल्यास अरंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आह़े नजीक असणाऱया फिनोलेक्स कंपनीच्या मालवाहतूक करणाऱया ट्रक्समुळे सायंकाळी येथे अर्ध्या-अर्ध्या तास वाहतूक कोंढी होत असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत़ याप्रकरणी हा रस्ता पूर्ववत करुन काही प्रमाणात रंद करण्याची मागणी वाहन चालकांसह परीसरातील नागरीकांनी केली आह़े

Related Stories

दूरसंचारची भारत एअर फायबर सेवा

NIKHIL_N

बेकारीमुळे युवक वैफल्यग्रस्त

NIKHIL_N

भांडण, तंटे मिटवून 25 वर्षांनी कातळवाडी आली एकत्र

Patil_p

पाणीटंचाईच्या कामांना सव्वा कोटी

NIKHIL_N

गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

NIKHIL_N

संजय घोगळे यांची व्यंगचित्रे अमेरिकन वेबसाईटवर

NIKHIL_N
error: Content is protected !!