प्रतिनिधी / मडगांव
रविवारी भल्या पहाटे कोलवा येथे पोलीस स्थानकाच्या समोर एक विचित्र अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगातील एक कार घरासमोरील गेट तोडून सरळ घरात घुसली. या अपघातात कार चालकाला किरकोळ मार लागला. ही कार गौरांग प्रकाश नाईक हा चालवित होता. कोलवा पोलिसांनी या अपघात प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याने गुन्हा नोंद केला आहे. चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. कोलवा येथील ग्रीन हाऊस जंक्शनवर हा अपघात घडला. पेटा कार घराची मुख्य गेट तोंडून आत घुसली व आतील व्हरांडय़ात जाऊन स्थिरावली. घराचा व्हरांडा ही मोडून गेला तसेच घरांच्या कौलाची हानी झाली.