तरुण भारत

सरदार्स मैदानावरील भाडेतत्त्वावरील गाळय़ांना चांगली बोली

बोलीवेळी भाडय़ाची रक्कम 19 हजार रुपयांपर्यंत पोहोचली :  निश्चित केलेल्या रकमेपेक्षा मनपाला तीन पटीने जास्त भाडे मिळणार

प्रतिनिधी / बेळगाव

सरदार्स मैदानावरील संकुलामधील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी चढाओढ वाढली होती. बोलीवेळी भाडय़ाची रक्कम 19 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मनपाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा तीन पटीने जास्त भाडे मिळणार आहे. सरदार्स मैदान आणि मनपा कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधील अशा सहा गाळय़ांना बोली लावण्यात आली. त्यामुळे सहा गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला वर्षाला दहा लाख रुपये भाडे मिळणार आहे.

सरदार्स मैदानावरील संकुलातील गाळय़ांचे बांधकाम अर्धवट असल्याचे सांगून लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. उर्वरित कामे पूर्ण करून येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी दुसऱयांदा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. रिसालदार गल्लीतील महापालिकेच्या जुन्या इमारतीमधील तीन गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. सरदार्स मैदानावरील चार गाळय़ांपैकी एक गाळा मागासवर्गियांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. एक लाख रुपये अनामत आणि 5100 रुपये भाडे महापालिकेने निश्चित केले होते. पण तीन गाळय़ांसाठी तब्बल 16 नागरिकांनी बोली प्रक्रियेत भाग घेतला होता. यावेळी लागलेल्या बोलीवेळी 19 हजार रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. 16500 रुपये किमान बोली लावण्यात आली. त्यामुळे मनपाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त भाडे मिळाले
आहे.

रिसालदार गल्लीत मनपाची इमारत असून या ठिकाणी महापौर-उपमहापौर आणि अधिकाऱयांची वाहने पार्क करण्यासाठी शेड उभारण्यात आले होते. पण महापालिका कार्यालय स्थलांतर झाल्याने शेडचा वापर होत नव्हता. मात्र, मनपा जुन्या तहसिलदार कार्यालयात विविध कार्यालये सुरू करण्यात आली असल्याने गाळय़ांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला
आहे.

प्रतिवर्षी मिळणार मनपाला 10 लाख भाडे

सदर गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला महसूल मिळविण्यासाठी गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येथील तीन गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शनिवारी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. येथील गाळे प्रथमच भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. गाळय़ांकरिता 3841 रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. बोलीवेळी 8000 हजार रुपये सर्वाधिक बोली लावण्यात आली. किमान 7500 रुपये बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे सरदार्स मैदान आणि मनपा जुन्या कार्यालय आवारातील सहा गाळय़ांसाठी भाडेकरू मिळाले असून या माध्यमातून मनपाला प्रतिवर्षाला 10 लाख रुपये भाडे मिळणार आहे. सदर गाळे 12 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.

लिलाव प्रक्रियेवेळी मनपा महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी, फारुक यड्रावी, साहाय्यक महसूल अधिकारी रवि मास्तीहोळीमठ, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

श्री चांगळेश्वरी मंदिरात चोरी

Rohan_P

ट्रक्टर खाली शाळकरी मुलगा चिरडला

Patil_p

मद्य विक्रीवर 3 मेपर्यंत राहणार निर्बंध

Patil_p

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rohan_P

बेळवट्टी-बाकनूर भागात बससेवेचा बोजवारा

Amit Kulkarni

इनोक्हा चोरणारी हायटेक टोळी सक्रिय

Patil_p
error: Content is protected !!