तरुण भारत

लष्कर भरतीकरिता कोरोना चाचणी सक्तीची

4 फेब्रुवारीपासून व्हीटीयू परिसरात भरती प्रक्रिया : 14 हजारहून अधिक ऑनलाईन अर्ज कोरोना चाचणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांची धावपळ

प्रतिनिधी / बेळगाव

लष्कर भरतीसाठी आवश्यक तयारी करण्यात आली असून दि. 4 फेब्रुवारीपासून व्हीटीयू परिसरात भरती प्रक्रिया होणार आहे. याकरिता आतापर्यंत 14 हजारहून अधिक मुलांनी ऑनलाईन अर्ज केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, भरतीवेळी येताना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. कोरोना चाचणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदारांना धावपळ करावी लागत आहे.

मराठा लाईट इन्फंट्रीच्यावतीने भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. खुल्या भरतीसाठी 14 हजारहून अधिक युवकांनी ऑनलाईनद्वारा अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांना भरतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आल्याने भरतीवेळी गर्दी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे भरतीसाठी येणाऱया युवकांना कोरोना चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी इतर कागदपत्रांसह कोरोना चाचणी प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. चाचणीचे प्रमाणपत्र 48 तासांच्या आतील असावे, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे लष्कर भरतीसाठी येणाऱया अर्जदारांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी चौकशी चालविली आहे.

 जिल्हा रुग्णालय आणि सरकारी प्राथमिक केंद्रात कोरोना चाचणीबाबत अर्जदारांनी विचारणा केली असता, खासगी रुग्णालयात तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोना चाचणीकरिता खासगी रुग्णालयात साडेतीन ते चार हजार रुपयांची आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्जदारांना साडेतीन ते चार हजार रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सक्ती करण्यात आल्याने आर्थिक भुर्दंड वाढला

कोरोना चाचणी केल्यानंतर निवड होईलच असे नाही. भरतीकरिता महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील युवक दाखल होत असतात. पण काहांची आर्थिक स्थिती हलाखीची असते. अशातच कोरोना चाचणीची सक्ती केल्याने आर्थिक भुर्दंड वाढला आहे. भरतीकरिता येणाऱया युवकांची थर्मल स्क्रिनिंग आणि ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पुरवठय़ाची माहिती घेऊन भरतीवेळी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

आरोग्य खात्याने चाचणीची सुविधा उपलब्ध कराव

14 हजारहून अधिक युवक भरतीकरिता येणार असल्याने सर्वांना ठरावीक वेळेत कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र मिळण्याची शक्मयता कमी आहे. त्यामुळे निर्माण होणाऱया अडचणींचा आणि युवकांवरील आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी आवश्यक तोडगा काढावा किंवा आरोग्य खात्याने कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Related Stories

परिवहनच्या बसेस जाग्यावरच!

Patil_p

सुवर्ण विधानसौधबाहेर जमावबंदीचा आदेश

Omkar B

दिवाळी पाडव्यामुळे कोटय़वधीची उलाढाल

Patil_p

कोल्हापूर सर्कल जवळ स्मोकशॉपवर छापा

Rohan_P

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 411 कोरोनाबाधितांची नोंद

Rohan_P

नदीकाठावरील गावांची जिल्हाधिकाऱयांनी केली पाहणी

Patil_p
error: Content is protected !!