तरुण भारत

टोल चुकला; पण जीवाला मुकला

आडीनजीक ट्रक अपघातात चालक ठार : नियंत्रण सुटल्याने घडली दुर्घटना

प्रतिनिधी / निपाणी

भरधाव जाणाऱया ट्रकचालकाचे वळण येताच नियंत्रण सुटल्याने ट्रकाची झाडास जोराची धडक बसून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना आडी फाटय़ानजीकच्या ओढय़ात शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. दिलीप नेताजी बनसोडे (वय 29, रा. सावंतपूर वसाहत, पलूस जि. सांगली) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तर या अपघातात राकेश वसंत बल्लाळ (रा. तांबवे, जि. सांगली) हा किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिलीप हा ट्रक (क्र. एमएच 50-4599) ने बांबवडे (जि. कोल्हापूर) येथून 20 टन भात घेऊन हुबळीला जात होता. यावेळी कागल व कोगनोळी येथील टोल तसेच आरटीओ चुकवून तो कागल एमआयडीसीवरून मांगूर, कुन्नूर, आडीमार्गे जात होता. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आडी फाटय़ानजीकच्या ओढय़ात आल्यानंतर वळणावर अचानक दिलीप याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यानजीकच्या झाडावर आदळला. यानंतर ट्रक रस्त्यानजीकच्या शेतात पलटी झाला. यात भाताची पोतीही शेतात सर्वत्र विखुरली होती. हा अपघात इतका भीषण होता की दिलीप याचा मृतदेह ट्रकमध्ये अडकला होता. यानंतर क्रेनद्वारे ट्रक व मृतदेह काढण्यात आला. निपाणी ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

Related Stories

हेमंत निंबाळकर यांचा कोरोना जागृतीचा व्हिडीओ व्हायरल

Patil_p

हासन बटाटय़ाला विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी समाधानी

Patil_p

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशीही पाच हजाराहून अधिक नवीन रुग्ण

Shankar_P

शिवसेनेची रुग्णवाहिका सीमाभागासाठी उपयुक्त ठरेल!

Amit Kulkarni

निपाणी आगाराची आंतरराज्य बससेवा बंद

Patil_p

इ. 7 वी ते 9 वीची परीक्षा रद्द

Rohan_P
error: Content is protected !!