तरुण भारत

हिंडलगा जि. पं. फंडातून रस्ताकामाचा शुभारंभ

हिंडलगा : हिंडलगा येथील गणेश मंगल कार्यालयापासून सिद्धार्थनगर पर्यंतच्या नवीन रस्ताकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थांनी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे होते. सदर रस्त्यासाठी जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. हिंडलगा गावातील अंतर्गत वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली होती. तसेच चारचाकी व इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गावच्या पूर्व भागातून बेळगाव सावंतवाडी व बॉक्साईट रोडला जोडणारा नव्याने रिंगरोड करण्यासाठी यात्रोत्सव संघातर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेत जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे यांनी निधी मंजूर करवून घेतला. त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करून या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पीडीओ गंगाधर नाईक व कृष्णा पावशे यांनी श्रीफळ वाढविले. निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी यात्रोत्सव संघाचे राजू कुप्पेकर, श्रीकांत जाधव, जयवंत साळुंखे निखील मालेकर, विनायक पावशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

कुमारस्वामी लेआऊट हस्तांतराचा मार्ग मोकळा

Amit Kulkarni

मुंबई-बेंगळूर या मार्गावर क्लोन ट्रेन सुरू करा

Patil_p

कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच

Patil_p

दुचाकीची पिकअप वाहनास धडक : 2 ठार

Patil_p

वाहन जप्त करण्याचा आदेश देताच दिली नुकसान भरपाई

Patil_p

वन्य प्राण्यांचा मानवावरील हल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!