तरुण भारत

अवचारहट्टी (येळ्ळूर) येथे विठ्ठलाई मंदिराची स्लॅबभरणी

बेळगाव : अवचारहट्टी (येळ्ळूर) येथील विठ्ठलाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.  रविवारी मंदिराचा दुसरा स्लॅबभरणी कार्यक्रम बेळगाव परिसरातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व जि. पं. चे उपाध्यक्ष अरुण कटांबळे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, केवळ बोलून आपली ओळख निर्माण होत नसते तर आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करायची असते. मागील अडीच वर्षात अनेक विकास कामे केली असून, उरलेली पुढील काळात केली जाणार आहेत. कमीत कमी राजकारण करून अधिकाधिक समाजकारण केल्यास लोक आपली आठवण ठेवतात, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी आमदार हेब्बाळकर यांच्या हस्ते कमानीचे पूजन करण्यात आले. जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते मशीन पूजन तर आमदार हेब्बाळकर यांच्या हस्ते काँक्रिटचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते एस. एम. बेळवटकर, किरण पाटील, इरफान तालिकोटी, राघवेंद सुतार, सिद्दाप्पा छत्रे, रमेश कुंडेकर, सुधीर लोहार उपस्थित होते. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा मेलगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कुरंगी यांचाही सत्कार झाला.  सूत्रसंचालन नामदेव कानशीडे यांनी केले. लक्ष्मण मेलगे, मारूती तुळजाई, यल्लाप्पा पाटीलसह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा!

Amit Kulkarni

कामगार-कच्च्यामालाची कमतरता; उद्योग अडचणीत

Omkar B

नवरात्रानिमित्त बाजारपेठही सज्ज

Patil_p

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर दारू – चिकन दुकानदारांचा कचरा

Patil_p

कंग्राळी बुदुक बसथांब्यावर गुटखा खाणाऱयांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

मंत्री राजेंद्र यड्रावकर यांची कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यांशी चर्चा, आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!