तरुण भारत

कचरावाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

दांडेली नागरिक-वाहनचालकांतून नाराजी : वाहने हटविण्याची मागणी

प्रतिनिधी / दांडेली

Advertisements

दांडेली नगरपालिकेची कचरा गोळा करणारी सर्व वाहने नगरपालिकेच्या समोरील जे. एन. रस्त्याच्या कडेला थांबत असल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत असल्याचे दांडेली जनतेतून व वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रभारी नगरायुक्त व तहसीलदार शैलेश परमानंद यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दांडेली नगरपालिकेच्या कुंपणाला लागूनच जे. एन. रस्ता आहे. नगरपालिकेसमोर खासगी दवाखाना आहे. बाजूला जेएफएफसी कोर्ट आहे. इतर शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. यामुळे येथे वाहने थांबण्याची संख्या अधिक आहे. नगरपालिकेसमोरच वाहने वळविण्यासाठी रस्ता क्रॉसिंग सर्कल आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नगरपालिकेची सात-आठ कचरा गोळा करणारी वाहने या सर्कलजवळ थांबत असल्याने इतर वाहने वळण घेण्यास अडचण होत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे, यामुळे येथे ही वाहने न थांबविण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. नगरपालिकेची ही सर्व वाहने पूर्वी नगरपालिकेला लागून शेड निर्माण केली होती तेथे थांबविण्यात येत होती पण आता इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे ही वाहने रस्त्यावर थांबत आहेत. पण जुन्या नगरपालिकेच्या इमारतीसमोर जागा रिकामी असल्यामुळे तेथे ही वाहने थांबविल्यास कोणतीच अडचण होणार नाही, अशी जनतेची मागणी आहे.

Related Stories

बास्केटबॉल स्पर्धेत जीआयटी सलग पाचव्यांदा विजेता

Amit Kulkarni

वंचित मुलांसाठी वेळ देणाऱया शीतल भंडारी

Patil_p

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद; एटीएम सुरू

Amit Kulkarni

राज्यात तीन महिन्यांत 458 हुंडाबळीच्या तक्रारी

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रामविकास सुधारणा कमिटीची निवड

Omkar B

सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!