तरुण भारत

दांडेलीतील नागरी समस्या तातडीने सोडवा

डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष डी. सॅमसन यांचे तहसीलदारांना निवेदन : विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी

प्रतिनिधी /दांडेली

Advertisements

दांडेली शहरात विविध समस्या आहेत. या समस्यांपासून नागरिक त्रस्त झाले असून याकडे नगरपालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे निवेदन डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष डी. सॅमसन यांनी तहसीलदार शैलेश परमानंद यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱयांना दिले.

दांडेली शहरात 337 एकर 20 गुंटे जागेचे अद्याप केजीपी झाले नाही. ते तातडीने करावे, शहरातील आयपीएम व डीएसएफए कंपनी बंद होऊन 25 वर्षे झाली. या दोन्ही कंपनीची मिळून सुमारे 600 एकर हून जागा राज्य सरकारने आपल्या ताब्यात घेऊन दांडेली नगरपालिकेकडे हस्तांतर करावी. लहान उद्योग सुरू करण्यास ही जागा उपलब्ध केल्यास शेकडो नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात  करण्यात आली आहे.

दांडेली नगरपालिका कार्यक्षेत्रातील मारुतीनगर, गांधीनगर, वनश्रीनगर, अजादनगर, जुने दांडेली, पटेलनगर व 177 भू प्रदेशात असलेल्या नागरिक वस्तीमध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठा व विकास कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व भागासाठी विशेष अनुदान मंजूर करावे, अशी या भागातील नागरिकांची मागणी होत आहे.

गांधीनगर येथे स्लम बोर्ड यांच्याकडून कॉलनी बांधण्यात आली आहे. यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे येथील जनतेने नगरपालिकेकडे  तक्रर केली आहे. गांधीनगर येथे आऊट पोलीस स्थानक सुरू करावे, अशी मागणी जनतेची आहे. याचा विचार जिल्हा प्रशासनाने करावा, असेही नमूद केले आहे.

वाहतूक कोंडी होऊन लहान लहान अपघात

सद्या दांडेली शहरात 174 कोटी रुपयाची ड्रेनेज योजना सुरू झालेली आहे. यामुळे प्रत्येक नगरात पाईप लाईनसाठी चर मारल्याने डांबरी व सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन लहान लहान अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची जनतेतून मागणी होत आहे.

सरकारी नियमाप्रमाणे 700 लोकसंख्या असलेल्या भागास एक स्वच्छता कामगाराची नेमणूक करावी, या कामगारांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करावे व इतर सोयी द्याव्यात तसेच शिल्लक राहिलेली वेतनातील फरक द्यावा अशी सफाई कामगारांची
मागणी आहे. शिवाय सरकारकडून अनेक भागात ग्रंथालये सुरू आहेत. पण गंथपालाची नेमणूक करावी, अशी मागणीही डी. सॅमसन यांनी केली आहे.

Related Stories

विधानपरिषदेत बोलून काय उपयोग?

Amit Kulkarni

एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग

Patil_p

आनंद चॅलेंजर्सचा 6 गडय़ांनी विजय

Patil_p

कारवारच्या नगराध्यक्षांनी अधिकाराची सूत्रे स्वीकारली

Patil_p

सुपर किंग्स, ग्लॅडिएटर्स संघ विजय

Amit Kulkarni

चिकोडी -रायबाग रेल्वे दुपदरीकरणाचे सर्व्हेक्षण 24 रोजी

Patil_p
error: Content is protected !!