तरुण भारत

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद

केएलई संस्थेच्या हायटेक सिम्युलेशन सेंटरचे मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी / बेळगाव

केएलई संस्थेच्या हायटेक सिम्युलेशन सेंटरचे रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमित शहा यांनी शिक्षण क्षेत्रात संस्थेने केलेल्या कामगिरीचे मुक्तकंठाने कौतुक केले.

जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये ऍडव्हान्स्ड सिम्युलेशन सेंटर आहे. या सेंटरचे अमित शहा यांनी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राणी चन्नम्मांची चांदीची मूर्ती देऊन अमित शहा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर अमित शहा यांनी सिम्युलेशन सेंटरची पाहणी केली व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी केएलई संस्थेचे संचालक उपस्थित होते. सिम्युलेशन सेंटरचे संयोजक डॉ. अभिजीत गोगटे, डॉ. राजेश माने, डॉ. चैतन्य कामत, डॉ. श्रीदेवी एण्णी आदी डॉक्टरवर्गही यावेळी उपस्थित  होता.

Related Stories

बेळगावातील 521 तपासणीच्या अहवालांची प्रतीक्षा

Rohan_P

कणबर्गीतील केगदी नाल्याची शेतकऱयांकडून स्वखर्चाने दुरुस्ती

Patil_p

कणकुंबीनजीक 63 लिटर मद्य जप्त, एकाची कारागृहात रवानगी

Omkar B

अकोळ येथे 112 क्रमांकाची जागृती

Patil_p

मेंढपाळाचा मुलगा बनला तहसीलदार

Patil_p

द वायरच्या संपादकांनी माफीनामा जाहीर करावा

Omkar B
error: Content is protected !!