तरुण भारत

मिरज तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्यांच्या गावातून सत्ता निसटली

शिंदेवाडीत 30 वर्षांनंतर सत्तांतर, मालगावमध्ये खोलकुंबे, कबाडगे गटाची बाजी

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्याच्या 22 ग्रामपंचायतीचा निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील बड्या नेत्यांच्या सत्तेला हादरे बसत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या ग्रामविकास पॅनलचा पराभव करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या कणकेश्वर पॅनेलने 15 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. येथे राष्ट्रवादीच्या गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

तर मालगावमध्येही राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष अप्पासाहेब हुळळे यांच्या गटाचाही प्रभाव झाला. हुळळे यांचे चिरंजीवही पराभूत झाल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या गटांचा पराभव झाला आहे. येथे धामणे गटाला 9, सांवत गटाला 7 जागा मिळाल्या. तर हूळ्ळे गटाला केवळ एक जागा मिळाली.

शिंदेवाडी ग्रामपंचायतीत तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. येथे अँड. सचिन पाटील यांच्या गटास नऊ पैकी आठ जागांवर विजय मिळाला. तर माजी पंचायत समिती सदस्य शंकर पाटील गटास केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले.

आरग येथे एस. आर. पाटील गटाला सहा, कित्तुरे गट दोन, शेतकरी आघाडी आठ, आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. मल्लेवाडीतही सत्तांतर झाले. येथे दरुरे गटाला 11 जागा मिळाल्या. तर विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही. एरंडोळीतही सत्तांतर झाले. येथे सत्ताधारी भाजपचे 11 सदस्य निवडून आले. तर विरोधी आघाडीचे सहा सदस्य निवडून आले. निवडणुकीचा स्पष्ट निकाल आणखी काही वेळात लागेल.

Related Stories

सांगली : आ. विनय कोरे यांचे पीए प्रभाकर सनमडीकर यांचे निधन

Shankar_P

सांगली: महापालिका क्षेत्रातील ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

triratna

सांगली : संख येथे पावणे सहा लाखांचा गांजा जप्त, आरोपी ताब्यात

triratna

सांगली : संशयित खुनी आरोपी २४ तासात जेरबंद

triratna

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना जत पोलिसांनी घेतले ताब्यात

Shankar_P

सांगली जिल्हय़ात आज नवे ११२ रूग्ण तर दोन मृत्यू

Shankar_P
error: Content is protected !!