तरुण भारत

अरे, प्रायव्हसी, प्रायव्हसी

व्हॉट्सअपचे स्वरूप म्हणे आता बदलणार आहे. पूर्वीसारखी प्रायव्हसी उरणार नाही असं लोक म्हणतात. कंपनीवाले म्हणतात की प्रायव्हसी तशीच राहील. रोज सकाल कोणालाही गुड मॉर्निंगसारखे पोकळ संदेश, सणासुदीला पोकळ शुभेच्छा, सुविचार-सुभाषिते (स्वतः वाचायचे कष्टदेखील न घेता) फॉरवर्ड करणारे अशा बातम्यांनी विचलित होतील असं वाटत नाही.

प्रायव्हसी जाणार म्हणजे आपल्याबद्दलची माहिती इतर कंपन्यांना पुरवणार असा त्याचा अर्थ असावा. आपल्या आर्थिक व्यवहारांचे तपशील इतरांना ठाऊक झाले की ते त्यांचा माल आपल्याला विकण्याचा प्रयास करणार. करू देत की! कोणी कोणाला गुपचूप पाठवलेलं प्रेमपत्र कंपनी उघड करील असं वाटत नाही! आपल्या खिशात स्मार्ट फोन असेल तर आपण कुठंही गेलो तरी गुगलला समजतं. आपण दुकानात, हॉटेलात वगैरे गेलो तर बाहेर आल्यावर गुगल लगेच आपल्याकडे चौकशी करतं की तिथली सेवा कशी वाटली. आता कुठंही हॉटेलमध्ये फॅमिली रूम नसतात आणि जुन्या कथांमधली पात्रे उरली नाहीत. नाहीतर पुलंचा मधु आणि केशर फॅमिली रूममधून बाहेर पडल्यावर गुगलने लगेच त्यांना विचारलं असतं की ‘आता कसं वाटतंय?’   

Advertisements

व्हॉट्सअप नव्हते तेव्हाचा काळ देखील आम्ही बघितलेला आहेच. त्या काल चिठ्ठय़ा लिहून विश्वासू दूत किंवा दूतीमार्फत पाठवण्याची पद्धत होती. काही जण मैत्रिणीला मुलीच्या सांकेतिक नावाने आणि काही जणी मित्राला सांकेतिक मुलाच्या नावाने चिठ्ठी लिहीत ज्या योगे चिठ्ठी पकडली गेली तरी कुणाला काही कळू नये.

प्रायव्हसी जपण्यासाठी ती त्याला समजवायची की ‘नाही कशी म्हणू तुला विडा रे दुपारी, पण थोरांच्या समोर खायची सुपारी.’ काही ‘तो आणि ती’ लोक एकमेकांच्या घरातल्यांसमोर किंवा परक्मयांसमोर सांकेतिक भाषेत बोलत. सर्वात लोकप्रिय भाषा म्हणजे ‘च’ची भाषा  “चद्याउ चकालस चपणआ चगेतबा चटूभे.’’ याचा अर्थ – उद्या सकाल आपण बागेत भेटू. हे एनक्रिप्शन लवकरच मोडून पडले. सर्वांना ही भाषा येऊ लागली. पण प्रायव्हसीसाठी प्रेम कधी अडून राहत नाही! उद्या व्हॉट्सअप सोडून लोक अन्यत्र धाव घेतील. आपण शांतपणे गंमत बघू.

Related Stories

व्यवस्थापन आणि समर्थांचा दासबोध

Patil_p

गोड बातमी

Patil_p

लस आली म्हणून निष्काळजीपणा नको

Patil_p

महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे रस्ता सुरक्षेलाच तडा

Patil_p

गांधीजींचा नैसर्गिक चिकित्सा सिद्धांत

Patil_p

वाढत्या चाकरमान्यांमुळे प्रशासन हतबल

Patil_p
error: Content is protected !!