तरुण भारत

गॅलक्सी एस-21 सिरीजच्या स्मार्टफोन्सचे आगमन

वृत्तसंस्था/ सेऊल

सॅमसंगकडून जागतिक स्तरावर गॅलक्सी अनपॅक्ड 2021 आभासी समारंभात सॅमसंग गॅलक्सी एस 21  सिरीज अंतर्गत स्मार्टफोनचे सादरीकरण करण्यात आले आहे. यात गॅलक्सी एस 21,  गॅलक्सी एस 21 प्लस व गॅलक्सी एस 21 अल्ट्रा या दमदार वैशिष्टय़ांसहच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यातील एस 21 व एस 21 प्लस हे फोन 5 जी सेवेसह सादर केले आहेत. यात कॅमेरा फोनमध्ये गॅलक्सी एस 21, अल्ट्राला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल.

Advertisements

सॅमसंगच्या गॅलक्सी एस 21 ची किंमत 59 हजारच्या घरात, एस 21 प्लसची किमत 73 हजारावर व अल्ट्राची किंमत 87 हजार 700 रुपये असेल. मात्र सध्याची आकारलेली किंमत ही सुरुवातीची किंमत असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सदरच्या फोनसाठी 14 जानेवारीपासून प्री ऑर्डर बुकिंगला सुरुवात झाली आहे. भारतात या फोन्सच्या किंमतीबाबत सॅमसंगकडून स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे दराबाबत अद्यापतरी ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. पण जवळपास वर दिलेल्या किंमतीत थोडाफार फरक असण्याची शक्यता सांगितली जात आहे.

गॅलक्सी एस 21

w अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीम

w 6.2 इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले

w 8 जीबी रॅम व 128 जीबी वा 256 जीबी स्टोरेज

w 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

गॅलक्सी एस 21 प्लस

w अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीम

w 6.2 इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले

w 8 जीबी रॅम- 128 वा 256 जीबी स्टोरेज

w 4 हजार 800 एमएएच बॅटरी

w 64 मेगापिक्सल कॅमेरा

गॅलक्सी एस 21 अल्ट्रा

w अँड्रॉइड 11 ऑपरेटेंग सिस्टीम

w 6.8 इंचाचा अमोलोड 2ƒ इनफिनीटी डिस्प्ले

w 12 जीबी व 16 जीबी रॅमचा पर्याय

w 108 मेगा पिक्सल कॅमेरा

Related Stories

ओप्पो एफ 17 प्रो चे सादरीकरण

Patil_p

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p

ई-फसवणुकीपासून सावधान

tarunbharat

देशात एप्रिलमध्ये स्मार्टफोन विक्री शुन्यावर

Patil_p

व्हॉट्सअ‍ॅपकडून ४६ दिवसात ३० लाख अकॉउंट बंद

triratna

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p
error: Content is protected !!