तरुण भारत

हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना देणार एक्सरे

ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांचा दावा

हृदयविकाराचा धक्का बसणार की नाही याची माहिती काही वर्षांपूर्वीच एक्स-रेच्या मदतीने मिळणार आहे. या संबंधी संशोधन करणाऱया ऑस्ट्रेलियन संशोधकांनुसार हृदयाशी संबंधित मुख्य धमनीत कॅल्शियमची पातळी अधिक वाढल्यावर हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका 4 पटीपर्यंत वाढतो. एक्स-रेच्या मदतीने दरवर्षी हजारो जीव वाचविले जाऊ शकतात असे संशोधनात म्हटले गेले आहे.

Advertisements

आजारापासून अनभिज्ञ

हृदयविकाराचा सामना करत असल्याचे अनेक जणांना ज्ञातच नसते. तसेच धमनीत कॅल्शियम जमा होत असल्याचे लक्षण त्यांना जाणवत नसते. मुख्य धमनीत हृदयापूर्वी कॅल्शियम जमा होते, वैज्ञानिक भाषेत याला एओर्टिक कॅल्शिफिकेशन म्हटले जाते. योग्यवेळी याचा थांगपत्ता लागल्यास औषधांद्वारे आजार वाढण्यापासून रोखता येत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या एडिथ कोवन विद्यापीठाचे प्राध्यापक जोश लेविस यांनी म्टले आहे.

मुख्य धमनीचे काम हृदयापर्यंत रक्त पोहोचविणे आहे, परंतु यात कॅल्शियम जमा होऊ लागल्यावर ती आंकुचित होत जाते. कॅल्शियम वाढल्यावर रक्तप्रवाह योग्यप्रकारे होत नसल्याने हृदयविकाराचा धक्का बसू शकतो. आहारातील असंतुलन, धूम्रपान आणि बैठय़ा कामासाठी शरीरात अशी स्थिती निर्माण होते, तर काही प्रकरणांमध्ये आनुवंशिक स्वरुपातही असे घडू शकते.

Related Stories

कॅन्सरशी ‘गाठ’ आहे !

Omkar B

समस्या रबडोमायलेसीस

Amit Kulkarni

एक तास कमी झोपताय

Amit Kulkarni

काळजी ‘क्वारंटाईन’ व्यक्तींची

Omkar B

रेमडेसिव्हर घेताय

Amit Kulkarni

मेडिटेशन का गरजेचे ?

Omkar B
error: Content is protected !!