तरुण भारत

तुफान दगडफेकीनंतर कोलकात्यात तणाव

भाजपच्या रोड शोदरम्यान तृणमूलचा हल्लाबोल

कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या रोड शोदरम्यान मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला आहे. भाजपच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. सोबतच जवळ असणाऱया इमारतींच्या गच्चीवरुन बाटल्याही फेकण्यात आल्या. यावेळी काही जणांच्या हातात तृणमूल काँग्रेसचा झेंडा असल्यामुळे हल्ला करणारे कार्यकर्ते तृणमूलचेच असल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षिण कोलकात्यातील चारु मार्केट परिसरात ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्री देवश्री चौधरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी कोलकाता येथे सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोड शोमध्ये सहभागी कार्यकर्त्यांवर सायंकाळच्या सुमारास दगडफेक सुरू झाली. यावेळी काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे घटनास्थळी चेंगराचेंगरी आणि धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे. दगडफेक करणाऱयांकडून ‘गो बॅक’च्या घोषणाही देण्यात येत होत्या. दगडफेकीनंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी परिसरातील वाहनांची आणि दुकानांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

येत्या एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या.

Related Stories

टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट त्रिसूत्री पुन्हा वापरण्याची गरज

datta jadhav

दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार?

Patil_p

‘इंडियन कोरोना’ म्हणणं पडलं महागात; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

triratna

लालूंच्या पक्षाला मोठा धक्का

Patil_p

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

triratna

मध्यप्रदेशात शिवराज सरकार तरणार!

Patil_p
error: Content is protected !!