तरुण भारत

गुलालातील कार्यकर्त्यांची वरात पोलीस ठाण्याच्या दारात

कराडात 19 जणांवर कारवाई, दिवसभर पोलीस ठाण्यात बसवले

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मतमोजणीनंतर काही विजयी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत हुल्लडबाजी केली. अशा 19 जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणून बसवले होते. काले, कार्वेसह चार गावांतील या कार्यकर्त्यांवर प्रशासनाच्या आदेशाच्या भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. 

तालुक्यातील 85 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालासाठी सोमवारी मतमोजणी पार पडली. मतमोजणीसाठी कराड शहरात उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निकाल लागल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत  उमेदवारांवरही गुलाल उधळला. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या पथकाने या हुल्लडबाजांची धरपकड सुरू केली. गुलालात भरलेल्या कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी उपविभागीय पोलीस ठाण्यात आणून बसवले. निकालानंतरही कार्यकर्त्यांना सोडले नव्हते. गुलालात भरलेल्या अवस्थेत 19 कार्यकर्त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवले होते. काले, कार्वे, विंग, सैदापूर गावातील हे कार्यकर्ते होते. त्यांच्यावर नियमाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या

Related Stories

सांगली : बिळाशीतील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

triratna

‘भारत बंद’मध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना सहभागी नाही

triratna

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात शुक्रवारी 8333 नवे रुग्ण

pradnya p

गोकुळमध्ये तयार होणार ‘महानंदा’ ब्रँड

triratna

सोलापूर : विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ‘डफली बजाओ आंदोलन’

triratna

गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत आईसह दोन मुलांचा मृत्यू

Shankar_P
error: Content is protected !!