तरुण भारत

कोव्हिड-19 लसीकरण

प्रतिनिधी/ सातारा

 देशासह, राज्यात व सातारा जिल्हय़ात ‘कोव्हिड-19’ लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 24 हजार 410 आरोग्य कर्मचाऱयांची लसीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. सदर लसीकरणा दरम्यान प्रत्येक दिवशी 100 जणांना ही लस देण्यात येणार असल्याचा नियम होता पण काही जणांना या लसीकरणा दरम्यान मोबाईलवर मेसेजच आला नाही. त्यामुळे ते लसीकरणासाठी पोहचु शकले नाही. याबाबत माहिती विचारी असता कोव्हिड शिल्ड ऍप द्वारे हा मेसेज येऊ शकला नसल्याबाबत सांगण्यात आले.

Advertisements

 त्यामुळे पहिल्या दिवशी ही मोहिम यशस्वीरित्या पार पडली आणि दुसऱया दिवशी केवळ 614 जणांनाच ही लस देण्यात आली. तसेच पहिल्या दोन दिवसाच्या लसीकरणानंतर पुढील दोन दिवस लसीकरण थांबविण्याचे आदेश सरकारी गाईड लाईन नुसार आले होते. त्यानंतर आता पुन्हा मंगळवार पासुन लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा हा 12 ते 14 आठवडय़ात पार पडण्याचे कालावधी पुढे जातो की काय असे वाटत आहे.

 सदर मोहिम ही सरकारच्या नियमांनुसार राबविण्यात येत आहे.  पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱया टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱया टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

 डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक

 सातारा जिल्हय़ात लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पडत आहे. शासनाच्या नियमांनुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे. आता आजपासून पुन्हा या मोहिमेस प्रारंभ होत आहे. लस घेतलेल्यांमध्ये काही जणांनाच किरकोळ चक्कर येण्यासारखा त्रास झाला. उर्वरीतांना कोणताच त्रास झाला.

Related Stories

अँकर कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा द्या

Patil_p

सातारा पोलीस दलातील कवयित्री संगीता माने यांच्या लावणीचे ध्वनीमुद्रण पूर्ण

Patil_p

रिपाइं नेते शरद गायकवाड यांचे निधन

Patil_p

राम हादगेंची पत्रकाराला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

Amit Kulkarni

सातारा : राज्य मार्गाच्या कामात अधिकाऱ्याची डोळेझाक

Abhijeet Shinde

महिला बचतगटांनी तयार केले मानिनी मास्क

Patil_p
error: Content is protected !!