तरुण भारत

आय-लीगमध्ये आज चर्चिल ब्रदर्सचा मुकाबला पंजाब क्लबशी

मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत आज कोलकातात तीन सामने होणार आहेत. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबचा तिसरा सामना आज मंगळवारी पंजाब फुटबॉल क्लबशी होईल.

चर्चिल ब्रदर्स क्लबने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात दिमाखदार पद्धतीने करताना इंडियन ऍरोज संघाचा पिछाडीनंतर 5-2 गोलानी पराभव केला. बलाढय़ मोहम्मेडन स्पोर्टिंग विरुद्धची त्यांची लढत मात्र गोलशून्य बरोबरीत सुटली. सध्या चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने दोन सामन्यांतून 4 गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. पंजाब एफसीचे दोन सामन्यांतून 3 गुण आहेत. हा सामना विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर दुपारी 2 वाजता होईल.

सायंकाळी 4 वाजता कल्याणी म्युनिसीपल स्टेडियमवर ट्राव आणि मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यात लढत होईल. सध्या मोहम्मेडन स्पोर्टिंगचा संघ दोन सामन्यांतून 4 गुणानी दुसऱया स्थानावर असून ट्रावचे दोन सामन्यांतून 2 गुण आहेत. त्यानंतर याच मैदानावर सात वाजता रियल काश्मीर आणि दिल्लीच्या सुदेवा एफसी यांच्यात तिसरी लढत होईल. रियल काश्मीरचे दोन सामन्यांतून 4 तर सुदेवा एफसीचे 3 गुण आहेत.

Related Stories

सोनाभाट साळगाव येथे बेकायदा शेड उभारण्याचा प्रयत्न

Omkar B

बदली व नोटीस रद्द करा व दिव्यांग प्रमाणपत्र द्या

Patil_p

विद्यार्थ्यांनी ज्ञानर्जनातून शिखर गाठावे

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीण जत्रोत्सवाची आज सांगता

Amit Kulkarni

करचुकव्या 77 उद्योगांची बँक खाती गोठवली

Patil_p

मडगावात शनिवारी सरकार विरोधात जाहीर सभा

Omkar B
error: Content is protected !!