तरुण भारत

बराटे दाम्पत्याला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी / बेळगाव

मार्कंडेयनगर बेळगाव येथील मार्केंडेय हायस्कूलचे शिक्षक सुभाष बराटे यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तर त्याच हायस्कूलमधील रेखा अष्टेकर-बराटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Advertisements

 आविष्कार फौंडेशनतर्फे सदर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक कार्याबरोबरच खेडेगावात जाऊन शाळेविषयी असलेली तळमळ, वेगवेगळे राबविलेले उपक्रम, मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निरंतर कष्टाची साधना, अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि स्वतः गरजूंना केलेली मदतीची दखल घेत या दाम्पत्याचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे डॉ. उत्तम गव्हाणे उपस्थित होते. अध्यक्षपदी आविष्कार फौंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 यावेळी बोलताना उत्तम गव्हाणे यांनी, एकाच शाळेत राहून बराटे दाम्पत्याची शिक्षणाविषयी कर्तव्यदक्षता पहावयास मिळाली. त्यामुळे असा गौरव करताना आम्हाला अभिमान आहे. सावित्रीबाईंचा वसा व जोतिबांचा मानवता धर्म पुढे शिक्षकांनी चालवावा, असे मत व्यक्त केले.

  यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष कृष्णकांत पवार, महिला संघटक जय़श्री पाटील, महाराष्ट्र प्रदेश महासचिव शैला कांबळे, सहकार्याकारिणी आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. बराटे दाम्पत्याला मिळालेल्या पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सुंदराबाई बराटे, मनाली व आरोही बराटे, आशा व इराणा हाराडे, सुभाष पाटील, सतीश पाटील, मनीष पाटील उपस्थित होते.

Related Stories

खानापूर येथील जनावरांच्या बाजाराला सुरुवात

Patil_p

रामदुर्ग येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण

Rohan_P

जिल्हय़ात आणखी 11 जण कोरोनामुक्त

Patil_p

सीमोल्लंघनासाठी एक तास अधिक वेळ द्या

Amit Kulkarni

मण्णूर-आंबेवाडी रस्त्याची सिद्धरामय्यांकडून पाहणी

Amit Kulkarni

300 किलो चांदीसह दोघांना अटक

Patil_p
error: Content is protected !!