तरुण भारत

देशात मागील 6 महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील सहा महिन्यातील निच्चांकी कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारी देशात 10 हजार 064 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 137 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 05 लाख 81 हजार 837 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 556 एवढी आहे.

Advertisements

सोमवारी 17,411 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 2 लाख 528 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 02 लाख 28 हजार 753 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

देशात आतापर्यंत 16 कोटी 78 लाख 02 हजार 827 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 7 लाख 09 हजार 791 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.18) करण्यात आल्या. 

Related Stories

अंतराळात मोठी दुर्घटना टळली

Patil_p

उत्तरप्रदेशात डझनभर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

datta jadhav

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला कोरोनाचा पहिला डोस

Rohan_P

पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर

Omkar B

दिल्लीत 564 नवे कोरोनाबाधित; 21 मृत्यू

Rohan_P

ICICI बँकेचे गुजरातमधील मुख्यालय येणार मुंबईत

datta jadhav
error: Content is protected !!